संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
राजुरा:- सविस्तर वृत्त या प्रमाणे राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक नाविण्यपूर्ण विकासाचे प्रेरणादायी मॉडेल तयार होत आहे. नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, गावकऱ्यांची नियमित सकाळी 4:30 वाजता श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्यानी व फुलांनी नटलेला बगीचा, गावाच्या मध्यभागी कोंडवाडयातून रुपांतर केलेले सार्वजनिक वाचनालय व संसाधन केंद्र, सुंदर शालेय परिसर, गाव परिसरात पाणी साठवणूकीची मागील पाच दशकापासूनचे केलेले नियोजन, शाळेत सुरु असलेले नाविण्यपूर्ण उपक्रम, शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा तसेच सर्व धर्मीय संस्कृतीचे संरक्षण इत्यादी. स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी करण्यासाठी करण्यासाठी विदेशातील चमूंनी भेट देवून कामाची पाहणी केली. या भेटीत कॅनडा देशातील शोरॉन बुटेअवू आणि चन्नई येथील कार्तिक मोरचन यांनी संपूर्ण गावाची व विकास माकामाची या चमूसोबत अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांतजी कुंभारे तथा जितेंद्रजी बैस, यांनी भेट देवून पाहाणी केली. सर्व भेट देणारे चमू सदस्यांचे स्मार्ट ग्रामच्या प्रवेश व्दारावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावाची पाहाणी करताना गावानी विकास कामाचा प्रवास कसा केला हे ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी उपसरपंच वासुदेव चापले, सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, सदस्य शंकर तोडासे, शिल्पाताई कोडापे यांनी सविस्तार माहिती दिली.
स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची माहिती ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी उपसरपंच वासुदेव चापले यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थांनी व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 4:30 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहे. ही बाब भेटीतून पाहणी करतांना जाणवली. स्वच्छता पाहून तर विदेश चमू भाराहून गेले. यानंतर संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 12000 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, नवीन तयार करण्यात आलेले ऑक्सिजन पार्क, गाव परिसरात पाणी साठवणूकीची मागील पाच दशकापासूनचे केलेले नियोजन, स्वच्छ शालेय परिसर, शाळेतील नाविण्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी, युवक – युवतीसाठी स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने विविध प्रशिक्षणाचे आयोजन तथा ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी ISO होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम दाखविण्यात आले. मंगी (बु) हे शाश्वत विकासाचे नाविण्यपूर्ण मॉडेल असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.
याप्रसंगी स्मार्ट ग्राम मंगी (बु) चे शिक्षक सुधीर झाडे, श्रीनिवास गोरे, मारोती चापले तसेच गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, रोजगारसेवक दिनेश राठोड, शालेय विद्यार्थीनी कु. वैष्णवी बाळकृष्ण चव्हाण आणि कु. प्राची संतोष रोहणे यांनी मोलाचे सहकार्य केले.