प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक फसवणुकीची खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनला फसवणुकीचा झाले गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी श्रीमती माया विठठलराव ढंगे वय 60 वर्षे रा. म्हॉडा कॉलनी सिंधी कॉलनी जवळ हिंगणघाट हिने तिचा मुलगा व मुलगी यांचे एमबिबिएस च्या मॅनेजमेट कोटया मध्ये ॲडमिशन करिता आरोपी शुभम साहेबराव शेटे रा, पिंपरी पुणे यास 1541000/- रू यांचे कोटक महिन्द्र बँक व स्टेट बँक ऑफ इडियाचे खाते मध्ये नमुद घटना ता वेळी जमा केले. त्या नंतर आरोपीने फिर्यादीस फेबुवारी 2023 पर्यत मुलांचे ॲडमिशन होवुन जाईल असे सांगितले पंरतु फेब्रुवरी मुलांचे ॲडमिशन न झाल्याने फिर्यादीने आरोपीला वेळावेळी मुलांच्या ॲडमिशन बाबद फोनवर विचारले असता आरोपी यांने फिर्यादीस पुढचा राउडला ॲडमिशन होवुन जाईन परतु मॅनेजमेंट कोटयाचे पुर्ण राउड संर्पल्याने फिर्यादी यांचे मुलांचे कोठेही ॲडमिशन झाले नसल्याने फिर्यादीने आरोपीस मुलांचे ॲडमिशन करिता दिलेले 1541000 रू परत मागितले तेव्हा आरोपीने पैसे परत करतो असे संगितले परतु आरोपी हा फिर्यादीला पैसे देण्यास टाळाटाळा करत आहे. जेव्हा आरोपीने आपली फसवणूक केल्याचे दिसून आल्याने फिर्यादीने हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिने मुलाचे एमबिबिएस व मुलीचे फिजीओथेरेपी पदव्युतर अभ्यासक्रम करिता आरोपीने ॲडमिशन करून देतो असे बोलुन फिर्यादीचे विश्वास संपादन करून आरोपीची फसवणुक केली. वेळावेळी पैसे घेवुन सुध्दा फिर्यादीचे मुलाची ॲडमिशन करून दिली नाही. आज दिनांक 31.01.2024 रोजी फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरुन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अप. क. 159 / 2024 कलम 420, 406 भादवी अन्वये गुन्हा नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.