निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- सर्वत्र प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या तयारीत व्यस्त असताना बिनभट्टपणे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल पथकाने तस्कराच्या मुसक्या आवळल्या. सदरची कारवाई 18 फेब्रुवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान गाडेगाव विरूर नवीन वस्ती येथे करण्यात आली. रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
कोरपणा तालुक्यातील घाटासह इतरही घाटा वरील वाळू तस्करांच्या गोरखधंद्यावर सातत्याने तहसीलदार कार्यवाही करीत आहे. मात्र यात रातोरात मालामाल झालेल्या तस्करांच्या मुजोऱ्या मागील काही घटनांपासून सर्वश्रुत असताना महसूल विभाग पूर्णता ॲक्शन मोडवर आला आहे.
मागील दोन महिन्यापासूनच्या महसूल विभागाचे आठ पथके दिवस-रात्र करीत या तस्करांचे कंबरडे मोळण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहे. धडक कारवाईने अनेक तस्करांचे कंबरडे मोडून गुन्हे दाखल झाले आहे. बहुतांश तस्कर राजकीय आधार घेत या गोरखधंद्याला खतपाणी घालण्याचा घाट रचत असतांना तहसीलदार मात्र तस्करांचे मनसुबे हाणून पाडत आहे. अशातच आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान विना नंबर प्लेट ट्रॅक्टर मधून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पथकाने गाडेगाव विरूर नवीन वस्ती येते अवैध रेती तस्कराच्या रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करीत कारवाई केली.
सदरची कार्यवाही कोरपणा तहसीलचे तहसीलदार प्रकाश वाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारंडा येथील मंडळाचे मंडळ अधिकारी धनंजय बुराडे, नांदा येथील मंडळ अधिकारी किशोर उईके, तलाठी भोयगावं साजा लस्मीकांत मासिरकर यानी केली.