अनिल कडू विशेष प्र.तिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट:- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत विद्यार्थ्याचे मन पुस्तकाकडे आकृष्ट करून त्यांच्यामध्ये वाचन संस्कार प्रबळ व्हावा या उद्देशाने भारत विद्यालयातील ग्रंथालय विभागा तर्फे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
या ग्रंथ प्रदर्शनी चे उद्घाटन हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्वास संघटनेचे अध्यक्ष विठठल गुळघाणे, प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेशजी धारकर, प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य तथा माजी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, मुख्याध्यापक राजु कारवटकर उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरिले ग्रंथपाल विकास नागरकर, जेष्ठ शिक्षक किशोर चवरे, दत्ता भांगे आदी उपस्थित होते.
या प्रंसगी श्रीमती शिल्पा सोनाले म्हणाल्या की विद्यार्थ्यामध्ये वर्गात अवांतर वाचण्याची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. वाचन संस्कार जपण्यासाठी मुलांना पुस्तकाकडे आकर्षित करून विद्यार्थ्यांना पुस्तक मित्र मंडळ बनविण्याची जबाबदारी शाळेची, पालकांची व ग्रंथपालांची आहे.
या ग्रंथप्रदर्शनीत ग्रंथालयातील कथा कादंबरी, बाल साहित्य, किशोर साहित्य, मराठी व इंग्रजी शब्दकोश, विश्वकोश, पौरानीक, क्रीडा, कथा, कादंबरी, दुर्मिळ वाचनीय पुस्तके, मासिके, वैज्ञानिक, स्पर्धा परीक्षा पुस्तके, शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांच्या माहितीची पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, विद्यार्थ्यांकरिता बोधकथा व गोष्टींची पुस्तके, कवितासंग्रह या सर्व पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रंथपाल विकास नागरकर यानी दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजु कारवटकर म्हणाले ग्रंथालय शालेय समृद्धीचा खरा आधार असून, ते आपल्याला वैचारिक संपन्नतेकडे घेऊन जातात, आजच्या विज्ञानयुगात स्मार्ट फोनच्या जमान्यातही पुस्तके आणि ग्रंथालय यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. व्यक्तींचा वैचारिक विकास करण्याचे काम फक्त पुस्तकेच करू शकतात त्यासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
या ग्रंथ प्रदर्शनीला विद्यालयातील विद्यार्थी भेट देत असून विद्यार्थ्या सह पालकानी, तसेच ग्रंथ व साहित्यप्रेमी व्यक्तीनी ग्रंथ प्रदर्शनीस भेट दयावी अशी विनंती मुख्याध्यापक राजुजी कारवटकर उपमुख्याध्यापक हरीशजी भट्टड, ग्रंथपाल विकास नागरकर यानी केले.

