कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असेलेल्या इरई ते कवठाळा रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून आम आदमी पार्टी चे कोरपणा सहसंघटक निखिल पिदूरकर यांनी तसेच इरई गावाकरयाणी शासनाकडे या रस्त्या संदर्भात अनेकदा पाठपुरावा केला. परंतु सदर मागणी अद्यापही प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींना वारंवार रस्त्याच्या संदर्भात अनेक निवेदन दिले. मात्र आमदार खासदार याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे.
इरई ते कवठाळा रस्त्याचे चार-पाच वर्षे अगोदर खडीकरण व डांबरीकरण झाले होते. मात्र तेव्हापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. इरई येथून जवळच तामसी येथील रेती घाट शासनाकडून लिलाव निघतो. त्यामुळे रेती भरलेले जड वाहतूक असलेले ट्रक या रस्त्याने ये जा करतात त्यामुळे या रस्ताची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती सध्या दिसतोय.
हा बारमाही वर्दळीचा रस्ता असून जवळपास दोन्ही गावच्या ७० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमिनी याच मार्गावर आहे. त्यामुळे शेती कामे करायला बैल बंडी किंवा सायकल मोटार सायकलने ये जा करण्यासाठी या रस्त्याने जाताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
याच सोबतच इरई, कवठाळा, गडचांदूर, कोरपणा,
गवाकडे जाण्यासाठी किंवा भाजीपाला गडचांदूर, चंद्रपूर, कोपरणा मार्केट नेण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे परंतु सध्या रस्ता वहिवाटीसाठी कुचकामी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतो. समोरच्या गावातील नागरिकांना कोरपणा येथे येजा करण्यासाठी सुद्धा हा रस्ता फार महत्त्वाचा आहे. ही अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या संदर्भात तात्काळ नवीन रस्त्याचा प्रस्ताव तयार करावा अशी मागणी निखिल पिदूरकर यांनी लोकप्रतिनिधी कडे केली आहे.