या कारवाईत १२ इसमावर गुन्हे दाखल करून १५,४९०/- रू. चा मुद्देमाल जप्त.
✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- दि.१२ सप्टेंबर रोजी सोनिया गांधी नगर झोपडपट्टी, कैलास भवन, नाल्याचे कडेला मोकळया पत्र्याचे शेडमध्ये, सार्वजनिक ठिकाणी स्वारगेट, पुणे येथे बेकायदेशीरपणे ५२ पत्त्यांचा पैशावर रमी हा जुगार खेळत असल्याची गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता बेकायदेशीरपणे ५२ पत्त्यांचा पैशावर रमी हा जुगार खेळत असल्याचे दिसल्याने १० इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम १५,४९०/- रूपये घटनास्थळावरून जप्त केली.
सदर जुगार अड्डा कोण चालवत आहे याची माहिती घेतली असता सदर जुगार अड्डा हा दोन इसम चालवत असल्याची माहिती मिळाली. म्हणुन सदर प्रकरणी नमुद १० ताब्यातील व ०२ पाहिजे अरोपी असे एकुण १२ इसमांविरूध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुरनं १९४/२०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.