विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली दि.1 मार्च:- सी समवाय 191 बटालीयन केंद्रीय राखीव पोलीस दल द्वारा सीवीक ॲक्शन कार्यक्रम द्वारा श्री सत्यप्रकाश कमान्डेड 191 वी वाहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागरण मेळावा मौजा हेडरी पोलीस मदत केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला आदित्य जिवणे उपविभागीय अधिकारी, उपविभाग एटापल्ली, योगेश चंद्रकांत रांजनकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हेडरी, डॉ. अनंतु एस. चिकीत्सा अधिकारी व सर्व पोलीस बलाचे अधिकारी राकेश हे ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राखीव पोलीस बल 192 हेडरी यांच्या वतीने गरजु व गरीब लोकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. ह्या सिविक ॲक्शन मध्ये औषधी, शेती अवजारे ज्यात, फवारणी स्प्रे पंप, पावडे, खुरपण्या, व फळझाडे तसेच ब्लॅंकेट, विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, खेळ साहित्य ज्यात फुटबॉल, नेट,व महिलांना शिलाई मशीन घरेलु साहित्य ज्यात कढई, गंज वाटप करण्यात आले.
ह्यामागील उद्देश सत्यनारायण कमांडोज यांना विचारले असता स्थानिक नागरिक व पोलीस ह्यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावे व स्थानिकांना पोलीस यंत्रणा वेगळी नसुन आपल्यातलीच आहे व पोलीस प्रती भिती नाहीशी होऊन समन्वय साधणे सोपे व्हावे हा असल्याचे सांगण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमानंतर विनोबा आश्रम शाळा हेडरी च्या विध्यार्थ्यांनी रेला न्रुत्य, विविध न्रुत्य व कौशल्य दाखविले व कौतुकास्पद कार्य केले. यावेळी या सिविक ॲक्शन कार्यक्रमाला हेडरी जवळील दहा गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.