अनिल अडकिने, नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 2 मार्च:- श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित्त श्री. संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्टच्या वतीने सारस्वतधाम न्यू बोरजवाडा येथे दोन दिवसीय महोत्सव सोहळा 3 मार्च ते 3 मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित्त 2 मार्चला सकाळी 5 ते 7 वाजे पर्यंत महाराजांचा अभिषेक होईल. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सामूहिक पारायणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत भजनाच्या कार्यक्रम होईल. 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हरिपाठ होईल नंतर लगेच पूजाअर्चना करून आरती करण्यात येईल. रात्री 8 वाजता पासून ह भ प नारायण महाराज शिंदे यांचे समाजप्रबोधनावर जाहीर कीर्तन होईल.
3 मार्च ला सकाळी 8 वाजता श्री संत गजानन महाराज यांची पालखी मंदिरातून निघाली बोरूजवाडा येथील वस्तीत भ्रमण करून ती 12 वाजता मंदिरामध्ये पोहोचेल. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत ह. भ. प. पंढरी महाराज ठाकरे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल.
या दोन दिवसीय सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान श्री. संत गजानन महाराज ट्रस्ट च्या वतीने मा.श्री राजूभाऊ कांबे (रामटेक जिल्हा अध्यक्ष विश्व हिंदू परिषद) परिवार व गावकऱ्यांनी केले.