पोलिसांनी घोन्सा येथील आरोपीला ठोकल्या बेड्या.
नितेश पत्रकार, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील मुकुटबन पोलिसांनी नकली नोटा चलनात आणल्या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात नकली नोटा चलनाचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी आरोपी प्रमोद किसन गाडगे रा.वल्हासा याला अटक करण्यात आली.
आरोपी किसन गाडगे हा नकली चलनी नोटा खऱ्या म्हणून बाजारात वापरण्यासाठी घेऊन येणार आहे अशी गोपनीय माहिती वरुन घोंसा येथे जाऊन पोलीस स्टॉप व पंचासह जाऊन सापळा रचनू सीताफिणे संशहीत ईसम प्रमोद गाडगे रा. वल्हासा याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून बनावटी चलनी नोटा मिळून आल्या.
त्यात १०० रुपयाच्या २४ बनावट नोटा एकूण २४००रुपये २०० रुपयाच्या ९ बनावट नोटा एकूण १८००रुपये ५०० रुपयाच्या ३ बनावट नोटा एकूण १५००रुपये असा एकूण ५,७०० रुपये बनावट नोटा पोलिसांनी प्राप्त केल्या.
आरोपी प्रमोद गाडगे रा, वल्हासा ता, झरि जिल्हा यवतमाळ याने भारतीय नाण्याचा बनावट चलनी नोटा आहे अशे माहिती असून त्या खऱ्या आहे म्हणून वापरण्यात आणल्या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी कृत्त कलम ४८९(ब) ४८९(क) २४३,भा, द, वि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास मुकुटबण पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ, पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ, पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे, खुशाल सुरपाम, दीपक ताठे, दिलीप जाधव, शेख नईम, संदीप बोरकर, अंकुश बोरकर यांनी केली आहे.