युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 19 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे म्हणून उमेदवार प्रचाराला लागले आहे. त्यात नागपुर या हेव्हीवेट सीट असल्यामुळे सर्वांचा नजरा नागपुर येथे लागल्या आहे. त्यात काँग्रेस नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे उभे आहेत. या दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी, केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचाऱ्यांकडून सरकारी तिजोरीत पैसा गोळा केल्याचे म्हटले. त्यांच्या याच टीकेला आता काँग्रेसने उत्तर देत थेट नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेत.
नागपुरात जुन्या पायाभूत सुविधा तोडून नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली भाजपवाल्यांनी त्याचे कंत्राट आपल्याच लोकांना दिले. त्यासाठी सिमेंट, गिट्टी, वाळू पुरवठा करण्याचे कंत्राटही आपल्याच कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे नागपुरात भाजपचे सर्व लोक श्रीमंत झाले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. नागपुरात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या प्रचार सभेत मुत्तेमवार यांनी हे आरोप केले.
नागपुरसाठी एम्स रुग्णालय आमच्या काळात मंजूर झाले, ते आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उभारणार होतो. मात्र, गडकरींनी हे एम्स नागपूर शहराच्या 20 किमी बाहेर नेले. याशिवाय भाजपवाल्यांनी आम्ही केलेले डांबराचे रस्ते फोडून काढले. अनेक फ्लायओवर तोडून नवीन फ्लायओवर बनवले. नागपुरात एक लाख कोटींची कामे केल्याचा दावा नितीन गडकरी करत आहेत. मात्र, हे खोटं आहे, नुसतं भाव वाढवून, आवश्यकता नसेल तिथे रस्ता करून छोट्या रस्त्याऐवजी मोठा रस्ता करून गडकरींनी फक्त भ्रष्टाचार केला. गडकरिंसारखा भ्रष्टाचारी पूर्ण महाराष्ट्रात कोणी नाही, असा गंभीर आरोपही मुत्तेमवार यांनी जाहीर सभेत केला. राजकारणात कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक प्रतिमा असलेल्या गडकरींवर केलेल्या या आरोपामुळे आता भाजपा काय प्रत्युत्तर देते किंवा भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.