अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समितीच्या निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ सहाय्यक निलेश फरताडे यांनी १ सप्टेंबर २०१२ ते १० जुन २०१५ पर्यंत ७ लाख ९६ हजार ८७० रुपये स्वताच्या व भावाच्या खात्यावर जमा करून शासनाची फसवणूक करुन अपहार केल्याची तक्रार गटविकास अधिकारी के. बि. अंजने यांनी केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक निलेश फरताडे हे हिंगणघाट पंचायत समितीत कार्यरत असताना त्यांनी शिक्षकांचे वेतन देयके, रजा देयके, वैदयकिय प्रति पुर्ती देयक लेखाशाखे कडुन पारीत झाल्यानंतर व लेखा शाखेकडुन धनादेश प्राप्त झाल्यानंतर मुळ शेडुल मध्ये फेरफार करून स्वतच्या व आपल्या भावाच्या खात्यावर रक्कम जमा करून शासनाचे ७ लाख ९६ हजार ८७० रुपये स्वताचा आर्थिक फायदा करून पदाचा गैरवापर करून अपहार केल्याची तक्रार गटविकास अधिकारी के. बि. अंजने यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपासात घेतला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.