हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाने केलेल्या एका प्रतापाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांनी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. मागील अनेक वर्षांपासून कोळसा खाण परिसरात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अनेक समस्या आहे. त्याबाबत नागरिकांनी वारंवार कंपनीला निवेदने देऊनही समस्या मार्गी लागल्या नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागले. तरी त्या समस्या जैसेथे असल्याने कोळसा खाण व्यवस्थापकांवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत होता.
भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे या खाणीच्या आजूबाजूला असलेल्या शेतातील पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेवून खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते.
गावातील समस्या बाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना थापड लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणे सुरू केले. ज्यानंतर आक्रमक झालेल्या काही लोकांना उपस्थित पोलिसांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनी परिस्थिती देखील अटोकात आणण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, त्याला फारशे यश आले नाही.
यावेळी आक्रमक झालेल्या प्रतिभा धानोरकरांच्या भावाने संतप्त होत कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांवर हात देखील उचलला. त्यामुळे पोलिसांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेत कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणीहून कसेबसे बाहेर काढले. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची, मागण्या ठेवण्याची एक पद्धत असते, शिष्टाचार असतो, पण यावेळी तो पाळण्यात आला नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी आल्याची चर्चा रंगू लागली आहे.