विठ्ठल ठोंबरे, शिर्डी /राहता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहता:- रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय , हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
ना.राधाकृष्ण विखे पाटील मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळ नांदूर व ग्रामपंचायत नांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ जून २०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना शुभेच्छा देत या रक्तदान शिबीर उपक्रमात युवा पिढी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरामध्ये नांदूर गावचे सरपंच विशाल गोरे, उपसरपंच सुदर्शन पारखे, ग्रामपंचायत सदस्य दिपक घोरपडे, सचिन आभाळे, सुनील सोडणार,प्रवीण गोरे,अर्जुन गोरे, नारायण गोरे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र बोर्से, मधुकर घोरपडे, अंकुश दिवटे, सुनील आभाळे, अमर गोरे, तुषार दिवटे, जावेद शेख, शिवाजी गोरे, शिंदे, मनोज बोधक, बाळासाहेब माळी, कर्मचारी वृंद नामदेव काढनोर, मयूर सोडणार, अभिजित आवारे अशा अनेक युवकांनी आज रक्तदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते यादरम्यान, शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात त्याचबरोबर कॅन्सर चा धोकादेखील कमी होतो. आजच्या रक्तदान शिबिराला प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्वांचे मनापासून आभार.