अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काही शेतकरी बिजप्रक्रियेला महत्व देत नाहीत. त्यामुळे बिज प्रक्रिया न करताच पेरणी केली जाते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. बिजप्रक्रिये मध्ये सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि बुरशीनाशक प्रक्रियेचा समावेश होतो. बियाण्यांतील पोषक द्रव्यांच्या आधारेच सुरुवातीच्या काळात रोपांची वाढ व विकास होत असतो. अन्नद्रव्यांच्या बीजप्रक्रिये मुळे बियाण्यांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून त्यांची उगवण क्षमता व पीक वाढीची गती वाढते. पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यां वर होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते.
बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. त्यामुळे बीजप्रक्रिया ही पिकाच्या पेरणीसाठी खूप महत्त्वाची आहे, असे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय, उमरखेड येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षीकातून शेतकऱ्यांना संदेश दिला.
यावेळी बीजप्रक्रिया चे महत्व सांगताना त्यांनी सांगितले की, बीजप्रक्रिया ही दोन पद्धतीने केली जाते. पहिली रासायनिक बीजप्रक्रिया व दुसरी जैविक बीजप्रक्रिया. यामध्ये प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यामध्ये बुरशीनाशकाची आधी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी. ही बीजप्रक्रिया पेरणीच्या आठ दिवसा अगोदरही करता येते. जैविक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्व दोन तास आधी करावी, असा संदेश कृषी कन्या कु. आचल ठक, निकिता उईके, सारिका डोंगे, अंकिता कौटकर , अनुजा कराऴे, मुक्ति आड़े, सिद्धि वाडगुरे, पूर्वा लांडे, शरयु ठोंबरे, वैष्णवी येनुरकर, साक्षी वानखेडे, रोशनी नाले, मोनिका फटिंग या कृषी कन्यानी दिला. या प्रसंगी शेतकरी बाबराव शिंदे, आर्शिवाद गावंडे, उत्तमराव शिंदे, वैभव शिंदे, मधुसूदन हरणे, पंकज पुसदेकर, अनील ठक, अभिजित लाखे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालया चे प्रा. एस.के. चिंताले, वाय.एस. वकोड सर यांचे मार्गदर्शना खाली प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला.