युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- काटोल येथे लहानुजी महाराज सभाग्रृहात आशा स्वयंसेविका, आगनवाडी स्वयंसेविका, गट प्रवर्तकाचा सयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र आयटकचे सरचिटनिस शामजी काले होते तर सौ. मंदाताई डोगरे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अरूण वनकर जिल्हा सचिव भारतीय कमुनिस्ट पार्टी, ज्योती अंडरसहारे आगनवाडी नेता, नरेन्द्र डोगरे अध्यक्ष पीरिपा नागपुर जिल्हा याच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.
या कार्यक्रमात आशा, आगनवाडी, गटप्रवर्तक याच्या समस्या वर सविस्तर चर्चा करण्यात आली या देशात महीला ना समानतेची वागनुक व अधिकार देण्यात यावे अशे सर्व नेते आपल्या भाषणात बोलताना दिसतात परंतू अधिकार देताना सत्तेत आल्यावर विसर पडतो अशे शाम काले म्हणाले.
अरूण वनकरानी सर्व समस्या ही सामाजिक जानिवेचा सरकार ला विसर पडला आहे कामाचा योग्य मोबदला सरकार नी द्यावा. सौ. मंदा डोगरे यानी महीला ना सरकार गुलाम समजून त्याचे करून विविध प्रकारची अनेक साथीचे रोगावर, दुरधररोगावर आशा जिवाची पर्वा न करता काम करतात कोरोना मध्ये ही आशा वर्करनी समोर येवून कोरोना योध्दा म्हणूण काम केले. परंतु त्याना योग्य मानधन मिळत नाही.
ज्योती अंडरसहारे यानी आंगणवडी सेवाकाळात लहान बालकाना कुपोषना पासून तर त्याच्या देखरेखचे सर्व कामे करतात अशा सर्वाना माधवन वाढवून सरकार ने कीमान वेतन कायदा नुसार वेतन द्यावे अशी मांगनी केली यावेळी नरेन्द्र डोगरे पीरिपा, बलवंत नारनवरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने काटोल व नरखेड तालुक्यातून आशा, आगनवाडी स्वयंसेविका, गटप्रवर्तक महीलाची उपस्थिति होती. यावेळी ज्योति रक्षित, सारीका धोटे, निर्मला देशभ्रतार, शीतल सोमकूवर, जिजा सेवतकर, कुमुद नोकरिया, प्रमिला चौधरी, नीलिमा गाडरे, सविता मानेराव, शारदा माटे, गायधने, भगत ताई यानी कार्यक्रम सफल करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमचे प्रस्तावित व संचालन सौ. मंदा डोगरे यानी केले तर आभार प्रदर्शन जोति रक्षित यांनी मानले.

