युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने कृषी संजीवनी पंधरवाडा 17 जून ते 1 जुलै पर्यंत तसेच कै. वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय कृषी दिन सोमवार तारीख 1 जुलै रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोध, पंचायत समिती सभापती प्रभाकर भोसले, पंचायत समिती उपसभापती श्रावणदादा भिंगारे, सदस्य विजय भांगे, वंदना बोधाने, जयश्री वाळके, मालती वसु, जिल्हा परिषद सदस्य पिंकी कौरती, देवानंद कोहळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी निकेश बागडे सावळी खुर्द, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनंदा सालोडकर सोनेगाव, प्रगतशील शेतकरी जनार्दन चोपडे खैरी, गणेश कुहीटे उपरवाही, उमेश उमरे खैरी, प्रतीक गुळांदे, देवबर्डी, चिंतामण पारस्कर सावळी खुर्द, सुधाकर कुबडे सेलू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
सदर कृषी दिनानिमित्त तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व कृषी विभागाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी यावेळी आपले नियोजन बद्ध शेतीचे अनुभव कथन केले, तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सॉलिडरी डॅड या संस्थे मार्फत मृद संधारण व पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन आशिष कुशवाल देवेंद्र सोनकुसरे व मयुरी ठोंबरे यांनी केले.
या कार्यक्रमात उपस्थित पंचायत समिती गटविकास अधिकारी अंशूजा गराटे, जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत राऊत, तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी विठ्ठल थूल, रवि राठोड, कृषी विस्तार अधिकारी नंदकिशोर खंडाळ, दीपक जंगले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जंगले कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांनी केले.