तो विलंब शुल्क भरण्यासाठी दोन ते तीन महिण्याच्या कालावधी देण्यात यावा. फिटनेस व गाडी पासिंगसाठी तालुक्याच्या ठिकाणीच कॅम्प घेण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन द्वारे मागनी.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यात स्कुल बस, ऑटो, व्हॅन यांची योग्यता प्रमाणपत्र पासिंगसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रतिदीन ५० रूपये विलंब शुल्क आकारल्या जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
स्कूल बस, ऑटोची योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन प्रतिदीन ५० रुपये विलंब शुल्क आकारत असून हा विलंब शुल्क स्कुल बस, ऑटो चालक भरण्यास तयार असून त्यांना दोन ते तीन महिन्यांच्या कालावधी देण्यात यावा.
दि. २६ डिसेंबर २०१६ रोजी सरकारने एक अधिसूचना काढून, त्यात परिवहन वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास त्या ऑटो चालकास प्रतिदिन ५० रुपये शुल्काची तरतूद केली आहे. परंतु वेळेची मुभा न देता दिनांक १७ मे पासून विलंब शुल्क आकारल्या जात आहे. हे अन्याय कारक असून विलंब शुल्क भरण्यासाठी स्कुल बस, ऑटो चालकांना दोन ते तीन महिन्यांच्या कालावधी देण्यात यावा, तसेच हिंगणघाट तालुक्यात स्कुल व्हॅन, बस, ऑटो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गाडी पासिंग करण्याकरिता कॅम्प तालुक्याच्या ठिकाणीच राबविण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेल तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तालुका सचिव हेमंत घोडे, जितेंद्र रघाटाटे, नितीन भुते आदी उपस्थित होते.