अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दिनांक 24:- रोजी हिंगणघाट येथील प्रस्तावित शासकिय महाविद्यालयाच्या जागा निश्चितीसाठी जिल्हाधिकारी वर्धा राहुल कर्डीले यांनी हिंगणघाट येथे आयोजित भेट दिली व उपलब्ध शासकिय जमीनीची सविस्तर माहिती प्रशासना कडुन घेतली. तसेच हिंगणघाट येथील शासकिय विश्रामगृहात आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षीय पदाधिकारी व संघर्ष समिती सोबत बैठक घेवुन प्रस्तावित वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागे संबंधी चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मौजा पिंपळगांव (मा), कोल्ही व नांदगांव (बो) या गावामधील उपलब्ध शासकिय जमिनीबाबत उप विभागिय अधिकारी व तहसिलदार हिंगणघाट यांचे कडुन या बद्दल माहीती घेतली. तसेच या जागे व्यतीरीक्त युध्दपातळीवर जागा शोधण्या करीता त्यांना सुचना केल्या.
पुढील सात दिवसामध्ये सर्व पर्यायी शासकिय जागे बाबतची माहीती तयार करुन आपल्या वैद्यकिय शिक्षण विभागास सादर करण्यात येईल. तसेच वैद्यकिय शिक्षण मंडळास त्यांचे पथक पाठवुन सर्व उपलब्ध पर्यायी जागांची पाहणी करुन मेडिकल कौन्सिलच्या निकषानुसार सुयोग्य जागेबाबत अंतीम निर्णय घेण्याकरीता देखील वैद्यकिय विभागास कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वर्धा राहुल कर्डीले यांनी सांगितले. यावर सर्व उपस्थितांनी सहमती दर्शविली व जागेबाबत तोडगा लवकरात लवकर काढणेबाबत जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली.
सदर भेटीवेळी उपविभागिय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, हिंगणघाट विधासभा मतदार संघाचे आमदार समिर कुणावार, माजी आमदार राजु तिमांडे, अतुल वांदिले, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर सर्व पक्षीय पदाधिकारी, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.