उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली, येथे आषाढ पौर्णिमेपासून बौध्द धम्मातील पवित्र वर्षावासाला सुरुवात झाली आहे. हे वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा पर्यंत चालणार असून तसेच त्यानंतर येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
वर्षावासाला आज गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी चार ते साडेसहा वाजता पर्यंत वर्षावास सत्रामध्ये मा.भंते महाथेरो डॉ. यशकाश्यपायन हे उपस्थित राहून बौद्ध धम्मा मध्ये “निरय लोक” आणि त्यामध्ये कोणते प्रकार आहेत याचा सविस्तर बौद्ध धम्मातील आशय व सिद्धांत सांगितला. नीरय म्हणजे दुर्गती परंतु शब्दशः याचा अर्थ नरक असा होतो परंतु तो घ्यायचा नसून दुर्गती हा अर्थ तंतोतंत बरोबर आहे. मानव अकुशल कर्म करतो, त्याला दुर्गती असे म्हणतात. मानव पशु पेक्षाही ही दुष्कृत्य करतो, पशूला कळते पण मानवाला सुद्धा कळत नाही, तो नैसर्गिक कृत्य करीत असतो म्हणजे पशूची उपमा सुद्धा मानवाला देणे चुकीचे आणि कमीपणाचे आहे.
ये पुढे बोलताना म्हणाले की, मानव प्राणी या प्रकारे निरय किंवा दुर्गतीला जातो. पंचशीलाचे काया वाचा मनाने जो मनुष्य पालन करतो तो मनुष्य जीवनामध्ये प्रवेश करतो. पंचशील अष्टशील तसेच दशशील याचे महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांनीच तंतोत पालन केलेले आहे. संत लोक सुद्धा तंतोतंत पालन करीत नाहीत, हे आपण टीव्ही बातम्या मध्ये बऱ्याच वेळा आणि वारंवार पाहिले आहे. लाभ आणि हानी यश आणि अपयश निंदा आणि स्तुती सुख आणि दुख याच्या पलीकडे जाऊन मानवाच्या हितासाठी कल्याणसाठी काम करतात, त्याला मनुष्य प्राणी म्हणतात आणि मनुष्यप्राणी जेव्हा पंचशील याचे पालन करतो तेव्हा तो देव लोकात जातो. देव लोकात गेल्यानंतर स्त्रोतापना, सक्रुतागामी, अनागामी आणि अर्हत अवस्थेला पोहोचतो. या चार अवस्था जे लोक पूर्ण करतात त्यांना भगवंत किंवा अर्हत पदाला पोहोचत असतात, याचे विवेचन विस्तृतपणे भंते यशकाशप यांनी सांगितले. त्यानंतर प्राध्यापक अशोक भटकर सर, संचालक सी. बी. चौधरी आणि संचालिका उषा कांबळे यांनी त्याअनुषंगाने प्रश्न विचारले आणि त्याची समाधानकारक उत्तरे भंतेजी यांनी दिली. त्यानंतर धम्मपालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
दिवसभर पाऊस असूनही विजय लांडगे, राहुल कांबळे, हनुमान साबळे सर्व उपासक माता बंधू भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल डॉ. सुधीर कोलप बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली यांनी आभार मानले. तसेच वर्षावास कालावधीमध्ये प्रत्येक गुरुवारी सायंकाळी चार ते सात भनते उपस्थित राहून मार्गदर्शक करणार आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक रविवारी सकाळी दहा ते अकरा आणि प्रत्येक पौर्णिमेस सायंकाळी सात ते नऊ वाजता बुद्ध वंदना आणि विशेष धम्म देशना होणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.