उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली, याच्या वतीने वर्षावासच्या अनुषंगानेआषाढ महिन्यातील आज रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजता बौद्ध संडे स्कूलमध्ये वर्षावास सत्रामध्ये जितेंद्र कोलप, भारतीय बौद्ध महासभाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आत्ताचे सांगली जिल्हा सरचिटणीस यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म मधील प्रथम खंड भाग पहिला सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले याबाबत जन्मापासून परिव्रज्येपर्यंत धम्मदेशना दिली.
यावेळी त्यांनी बौद्ध धम्मातील सिद्धार्थ गौतमाचे कुळ, पूर्वज, जन्म, असित मुनीचे आगमन, महामायेचा मृत्यू, असीत मुनिने केलेली भविष्यवाणी मुळे आपला पुत्र सिद्धार्थ गौतम याला वाचवण्याचा पित्याच्या योजना असफल झाल्या. त्यानंतर गृहत्याग केल्यानंतर आलार कालाम यांच्याकडे जाऊन ध्यान मार्गावरील अभ्यास केला. त्यांच्याकडून पुढील शिक्षणाची माहिती अपुरी असल्यामुळे कोशल देशांमध्ये श्वासोच्छ्वास थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची प्रक्रिया आत्मसात पणे शिकल्यानंतर समाधी मार्गाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उरुर्वेला पर्वत येथे जाऊन त्यांनी पाच शिष्य यांच्यासोबत वैराग्याचा कठीण अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी दिवसा गणिक अन्नत्याग कमी करत फक्त डाळीच्या एका त्या दाण्यावर एखाद्या तीळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजरात करू लागला, त्यामुळे त्याच्या पोटावर हात लावला तर त्यांच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागेल इतके शरीर क्षिण झाले.
उरुवेला येथील सेनानी गावामध्ये सेनानी नावाचा गृहस्थ राजा होता त्याची मुलगी सुजाता हिने गौतम बुद्धास वटवृक्षाच्या झाडाखाली स्वतः शिजवलेले अन्नतीने एका सोन्याच्या पात्रात दिले आणि त्यांनी ग्रहण केल्यानंतर त्यांची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. भूक हा रोग आहे अन्न हे औषध आहे. अन्ना शिवाय माणूस जगू शकत नाही त्यांना कळून चुकले. त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले पाच तपस्वी त्यांच्यावर रागावले त्यांचा तिरस्कार करून त्यांना सोडून गेले. त्यामुळे निरंजना नदीच्या दुसऱ्या तिरावर मार्गक्रमण केले. गया येथे त्यावेळेस त्यांनी एक पिंपळ वृक्ष पाहिला आणि वृक्षा खाली पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून पिंपळा ज्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्ती करून घेण्याचा निश्चय केला. सोबत चोळीस पुरेल एवढे अन्न घेतले होते. एकूण चार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.
ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी चार आठवडे चिंतन केले. ज्ञान प्राप्तीनंतर सात आठवडे त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक आठवडा चिंतन मनन केले आणि मिळालेले ज्ञान आपल्या सोबत असलेल्या गुरूंना देण्याचे मनात निश्चय केला. त्यानंतर गंगा नदीच्या कडे जाऊन वाराणसी जवळ चौकडी टेकडीवर जिथे आता चौखंडी स्तूप आहे त्या ठिकाणी निरीक्षण केले असता त्यांचे पाच पूर्वीचे सोडून गेलेले पाच शिष्य कौडीन्य, वप, भदिय, महानाम, अश्वजीत यांना आषाढ पौर्णिमे दिवशी पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग बौद्ध धम्माची पंचशील, अष्टशील, दशशील तत्त्वे सांगितली. धम्मपवन चक्क सुत होय. असे धम्म ज्ञान सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्याची ओळख श्री. माने सर यांनी करून दिली. यावेळी श्री. घाडगे सर यांनी पाहुण्यांचे उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर धम्मपालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व उपासक माता बंधू भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल डॉ. सुधीर कोलप बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली यांनी आभार मानले. तसेच वर्षावास कालावधीमध्ये प्रत्येक गुरुवारी सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत भंते उपस्थित राहून मार्गदर्शक करणार आहेत, त्याचप्रमाणे पुढील रविवारच्या दिवशी प्राध्यापक अशोक भटकर सर माजी सचिव धम्मदेशना देणारा असून रविवारी सकाळी दहा ते अकरा आणि प्रत्येक पौर्णिमेस सायंकाळी सात ते नऊ वाजता बुद्ध वंदना आणि विशेष धम्मदेशना होणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.
त्याच प्रमाणे आज रोजी सकाळी साडेसहा वाजता सर्व उपासक बंधूंनी उपस्थित राहून स्लॅब वरील संपूर्ण स्वच्छता करून गळती थांबविले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच तळघरांमध्ये पाणी साठले असल्यामुळे ते काढण्यासाठी पण उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती सर्व उपासक बंधूंना केली.