श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- शहरातील नामवंत आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत बाभुळकर याची SBI बँकेच्या उच्चपदी (Scale 1 Officer) म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना घडवणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली आहे. येथील विद्यार्थी भारतासह परदेशात मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने पुन्हा यशाची पताका फडकवली आहे. SBI या नामांकित बँकेच्या उच्चपदी (Scale 1 Officer) पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल अनिकेत बाभुळकर याचे आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्रजी सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्यासह वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
बीडच्या आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे तेथील विद्यार्थी पुढे जावून चांगल्या पदावर दिसतात. अनिकेत बाभुळकर यांची SBI बँकेच्या उच्चपदी (Scale 1 Officer) म्हणून निवड झाली. या यशाबद्दल आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा, उपप्राचार्य ए.यु. सोळंके, प्रा.जी.एम. गुजर, प्रा. पी.एस. राठोड, प्रा. एम.ए. पुंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
आदित्य शिक्षण संस्थेत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे इथपर्यंत आलो:
मी आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात सन २०१९ मध्ये पदवी पूर्ण केली. येथे पदवीचे शिक्षण घेत असताना आदित्य शिक्षण संस्थेत सर्व गुरुजणांकडून ज्ञानार्जनाबरोबर सामाजीक जिवन जगण्याची मिळालेली शिदोरी मला इथपर्यंत घेवून आली. आदित्य शिक्षण संस्थेत मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आज मी SBI बँकेमध्ये स्केल १ अधिकारी झालो आहे.
–अनिकेत बाभुळकर