आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वडनेर:- वडनेर ग्रामपंचायत येते 77 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रीय थोर महापुरुष यांच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्राम पंचायत प्रशासक श्री कोडापे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विकास विद्यालय वडनेर, नि. मु घटवाई विद्यालय वडनेर, इंदिरा गांधी विद्यालय वडनेर यांच्या वतीने बँड पथका द्वारे राष्ट्रीय झेंड्याला श्री कोडापे प्रशासक वडनेर यांच्या उपस्थिती सलामी देण्यात आली.
यावेळी इंदिरा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनींच्या वतीने स्वातंत्र्य दिनावर भाषण देण्यात आले तसेच नि. मु घटवाई विद्यालयाच्या विद्यार्थयांनी ग्रामपंचायतच्या प्रांगणात लेझीम पथक द्वारे कला दाखविली. यावेळी उपस्थित सर्व विद्यालयाच्या वतीने बँड पथक द्वारे राष्ट्रगीत सादर करून स्वातंत्र्यदिन बद्दल जयघोष करण्यात आले. ग्रामपंचायत वडनेर कडून उपस्थित गावातील नागरिक विद्यार्थी शिक्षक पालक कर्मचारी यांना अल्पहार देण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित श्री कोडापे, सौ कविता वानखेडे सरपंच, विनोद वानखेडे माजी सरपंच श्री. रामटेके ग्राम विकास अधिकारी आरिफ शेख, वर्षा भोयर, दिपाली भुते, वनिता कळसकर, मंदा आत्राम, संजय भोयर, सुनील मून, घनश्याम भगत, सुरेश भगत, कृष्णाजी महाजन, राजेंद्र भोरे, हनीफका पठाण, दशरथ दुर्गे, मोहन लोहकरे, गुणवंत कुंभारे, सुनील मेश्राम, विशाल दिवे, डॉक्टर खत्री, प्रफुल्ल देवतळे, पांडुरंग निंबाळकर, विजय ढोक, महेंद्र महाजन, मंगेश भोयर, गणेश हिवरकर,, अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस तलाठी कृषी सहाय्यक विद्युत अभियंता मोठ्या संख्येने गावातील माजी पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते.

