उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने वर्षावासाच्या अनुषंगाने आषाढ महिन्यातील आज रविवार दिनांक 18 ऑगस्ट 20 24 रोजी सकाळी दहा ते अकरा या वर्षावासाच्या 28 वा दिवशी याचे संचालक संजय घाडगे सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालिका उषाताई कांबळे, अवंतिका वाघमारे यांच्या उपस्थितीत करुणेचे महासागर महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विहाराचे संचालक संजय घाडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून महापरिनिर्वांपर्यंत व्यवस्थितपणे त्यांनी केलेले कार्य संविधान निर्मिती याची सविस्तर आणि व्यवस्थितपणे माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे एस आर माने सर यांनी प्रास्ताविक केले पाहुण्यांचे स्वागत उषा कांबळे संचालिका यांनी केले. यावेळी विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून धम्मपालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाचे सांगता होईल असे सांगितले. तसेच दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते नऊ श्रावण पौर्णिमेनिमित्त महाथेरो डॉक्टर यश काशपायन भदंत यांची धम्मदेशना होणार असल्याने यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याबाबत विनंती केली.