आमदार समिर कुणावार यांनी केले कंपनी व्यवस्थापनाकडे प्रयत्न.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गिमाटेक्स वणी युनिट येथील कपडा विभागात कार्यरत कामगार स्व. अमोल गायकवाड रा.कुटकी याचा कॅन्सर या आजाराने नुकताच दि.०३ जुलै रोजी मृत्यू झाला. या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार समिर कुणावार तसेच संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांनी गिमाटेक्स व्यवस्थापनाला पाठपुरावा करून मृत कामगाराच्या परीवाराला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले व्यवस्थापन व संघटना यांच्या कराराप्रमाणे प्रती कामगार शंभर रूपयेप्रमाणे सर्व कामगारांच्या पगारातुन कपात करून एकुन १ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
सदर धनादेश देतेवेळी आमदार समीर कुणावार यांचे सह संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे, दिवाकर बरबटकर, दामोदर देशमुख, जिवन भाणसे, प्रशांत शेळके, राकेश तराळे, जयंत बावणे, हेमंत भगत, श्रावण थुटे, विनोद कोल्हे, लक्ष्मण जयपुरकर, राहुल देशमुख, विनोद कावळे, मनोज जुमडे, विजय थुल इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व दिवंगत कामगाराचे कुटुंबीय उपस्थित होते.