प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील वर्षीच्या रब्बी हंगामात गारपिटीने देवळी तालुक्यातील चना, गहू, कापूस, तुरीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानीचे पंचनामे व भरपाईच्या मागणिकरिता अर्धनग्न आंदोलन करण्यात आले होते. अनेक आंदोलने, वेळोवेळी पाठपुराव्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. परंतु या नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेत अनेक तृट्या असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
आज नायब तहसीलदार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. नुकसान भरपाई करिता दोन हेक्टर ची मर्यादा असून कापूस-तूर करीत ₹१३६००/- हेक्टरी व चना-गहू साठी ₹२७०००/- हेक्टरी मदत ठेवण्यात आली आहे. पंचनाम्यावेळी आराजी कमी टाकल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला. नुकसान भरपाईच्या यादीत अनेक शेतकऱ्यांची नावे नसल्याने बहुसंख्य शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याची माहिती दिली.