*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित*
*मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी*
मोबाईल नंबर 9420751809
दिं.१९ सप्टेंबर २०२४
चामोर्शी:- आपले सरकार, कामगिरी दमदार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, मातृ शक्तीचा, नारीशक्ती च्या सन्मानाासाठी भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा तालुका चामोर्शी तसेच माजी खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने आज दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोज गुरुवारी बालाजी सभागृह,चामोर्शी येथे मा.देवेंद्रजी ऊर्फ देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींचा/ मातृशक्तीचा/ नारीशक्तीचा भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आले होते.
या भव्य महिला मेळाव्याच्या अध्यक्षीय स्थानावरून माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले सामाजिक कार्य असो, कि इतर कुठलेही कार्य असो महिलां सुद्धा पुरुषाला खांदाला खांदा लावून इतरही क्षेत्रात काम करतांना दिसत आहे.संसारिक क्षेत्रात सुद्धा महिलांचा मोठ्या प्रमाणात योगदान आहे.यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणून महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व तिला कुटुंबाचा आधार मिळावा, कुटुंबाचा उदरनिर्वाद चांगल्या प्रकारे चालावा.सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा महिलांचा योगदान असावा व त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अस्तित्वात आणली.
केंद्र व राज्य सरकार महिला भगिनींच्या भक्कमपणे पाठीशी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने घेतलेले निर्णय महत्वाचे आहे असे प्रतिपादन मा.खा.अशोकजी नेते यांनी या भव्य महिला मेळाव्याच्या प्रसंगी केले.
पुढे बोलतांना संसदेत महिलांना नारी शक्ति वंदन या विधेयकाला ३३% राजकीय आरक्षण देण्यासंबंधीत विधेयक पारित करण्यात आला. त्यावेळी मि सुद्धा त्या विधेयकांवर स्वाक्षरी केली.याचा ही मला अभिमान वाटतो. महीला वर्ग सुद्धा कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये.प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावे. मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत,शासनाच्या विविध योजनाची माहीती देत, लोकसभेत मी अनेक प्रश्न मांडून जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे. यापुढेही मी जनतेच्या सेवेत तत्पर राहील.तसेच महिलां भगिनींच्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.असे व्यक्त मा.खा.नेते यांनी केले.
या सोबतच गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या ठिकाणी महिलांच्या मदती करिता व महिला भगिनीं ना धावपळ होऊन त्रास होऊ नये याकरिता कार्यालय खोलण्यात आले.जे महिला अजूनही अपात्र आहेत अशा महिलांनी कार्यालयाशी संपर्क साधावा व याचा पुरेपुर महिलांनी लाभ घ्यावा.असे यावेळी मा.
खा.नेते यांनी यावेळी व्यक्तव्य केले.
मा.खा.श्री. अशोकजी नेते यांचेकडून या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक महिला भगिनीं लाडक्या बहिणीला गिफ्ट सुद्धा देण्यात आले.
मान.फग्गनसिंह कुलस्ते यांनी उद्घाटन प्रसंगी बोलतांना म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांसाठी योजना आमच्या सर्वप्रथम मध्यप्रदेश मध्ये लागू केली.याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा हि योजना आणली अतिशय महिला भगिनींसाठी महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा स्वागत करतोय.देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हे देशासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन काम करतात. त्यांच्या नेतृत्वात केंद्रात अनेक योजना आहेत. मला पंतप्रधाना सोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य पण आपण महाराष्ट्रातील जनतेनी लोकसभेत काँग्रेसच्या खोटया अपप्रचाराला बळी पडले. काँग्रेसकडे व्हिजन नाही, विकास कामे नाही.आगामी येणाऱ्या विधानसभेत आपण नक्कीच भाजपाला साथ देऊन विजयी संकल्प करावे.भाजपा हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास घेऊन चालणारा पक्ष असे मत या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने या मेळाव्याचे उद्घाटक- मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते खासदार मंडला लोकसभा क्षेत्र, अध्यक्ष संसदीय अनु.जाती,जनजाती समिती भारत सरकार तथा गडचिरोली/चंदपूर प्रवासी प्रभारी,मेळाव्याचे अध्यक्ष श्री. अशोकजी नेते माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा, तसेच संयोजक गडचिरोली – चंदपूर लोकसभा,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवरावजी होळी,महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,माजी आमदार डॅा. नामदेवराव उसेंडी,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.गिताताई हिंगे,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी चे जिल्हा प्रभारी डॅा.मिलिंदजी नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,भाजपा तालुकाध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर,नगरसेवक तथा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,जेष्ठ नेते नामदेवराव सोनटक्के, तालुकाध्यक्षा अनिता राँय, कार्यक्रमाचे संचालन तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, नगरसेविका सोनाली ताई पिपरे,जिल्हा सचिव वर्षा ताई शेडमाके,प्रतिमा सरकार,जेष्ठ नेत्या आकुली बिशवास, संगिता भोयर, जिल्हा महामंत्री सिमा कन्नमवार,पुष्पाताई करकाडे, तसेच मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.यावेळी मोठया संख्येने महिला भगिनीं व कार्यकर्ते उपस्थित