उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास पावन पर्व च्या अनुषंगाने भाद्रपद पौर्णिमेनिमित्त मंगळवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये ऍड. डॉ. सुगंध वाघमारे भारतीय बौद्ध महासभा पलूस बौद्धचार्य यांनी करुणेचे महासागर, महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप दीप पुष्प यांनी अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम विहाराच्या संचालिका शैलाजा संजीव साबळे यांनी सर्व उपस्थित उपासक, उपासिका, माता बंधू भगिनी, संचालक मंडळ यांचे स्वागत करून भाद्रपद पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. संचालिका उषा अशोक कांबळे यांनी एड. डॉ. सुगंध वाघमारे भारतीय बौद्ध महासभा पलूस यांचा थोडक्यात परिचय करून दिला. दीपा दीपक कांबळे यांनी त विहाराचा इतिहास थोडक्यात विशद केला. तसेच विहारांमध्ये वर्षावास पवन पर्वाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. विहाराचे अध्यक्ष, डॉक्टर सुधीर कोलप यांच्या हस्ते पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बुद्ध, धम्म, संघ वंदना, भीम स्तुती वंदना उपस्थित सर्व उपासिका उपासक यांनी सामुदायिक ग्रहण केली. एड. डॉ. सुगंध वाघमारे यांनी खुदक निकाय तथा अंगुतर निकाय मधील धम्मपदातील यमक वगो प्रथम धम्मपद “मनोपुब्बगमा धम्मा मनो सेट्टा मनोमया! मनसा चे पदुठेठन,भासति वा करोति वा ! ततो नं दुखमन्वेति, चक्क्ं वहतो पदं!!” या धम्मपदातील गाथेने धम्मदेशनेस सुरुवात केली.
मन हे सर्व संस्काराचे उगमस्थान आहे, मन हेच प्रमुख आहे आणि सर्व धर्म प्रमुख आहे.धर्म म्हणजे मनात निर्माण होणारे सर्व प्रकारचे विकार होय. जी व्यक्ती आपल्या मनामध्ये वाईट व अकुशल विचार आणून बोलतात किंवा शरीराने अकुशल कर्म करतात त्यांच्या पाठीमागे दुःख हे बैलांच्या गाडीचे चाक जसे पाठलाग करते तसे दुःख पाठलाग करीत असते. मनामध्ये विचार येतात, ते सत्य मानतो. भगवान बुद्धांनी मनावरच फार मोठे संशोधन केलेले आहे. मन हे सर्व संस्काराचे उगम स्थान आहे. जो मनुष्य अकुशल मनाने वागतो,बोलतो, चालतो त्याच्या पाठीमागे दुःख बैलाच्या गाडीचे चाक जसे पाठलाग करते, तसे दुःख पाठलाग करते. यमक वगातील द्वितीय गाथा अत्यंत महत्त्वाची असून मनो पुब्बगंमा धम्मा मनो सेटटा मनोमया ! मणसा चे पस्सनेन,भासति वा करोति वा ततो नं सुख मन्वेति,छायाव अनपायिनि!! जो मनुष्य आनंदी व संतोष मनाने बोलतो, चालतो, वागतो व शरीराद्वारे कुशल कर्म करतो त्याच्या पाठीमागे सुख कधीही साथ न सोडणाऱ्या सावलीप्रमाणे पाठलाग करते.
अकोच्छी मं अवधि मं अजिनि मं आहसि मे! ये च तं उपनय्यन्ति वेर्ं तेसं न समन्ति !! मला त्यांनी मारले, माझ्यावर तो तो चिडला, त्याने मला हरवले, मला त्यांनी लुटले, अशी मनामध्ये जे गाठ बांधतात त्यांचे वैर कधीही शांत होत नाही. न हि वेरेन वेरानि,सम्मन्तिध कुदाचन! अवेरेन च सम्मन्ति,एस धम्मो सनतनो!! वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैर मैत्रीनेच वैर शांत होते. आणि हाच खरा सनातन धर्म आहे. उपासकास पंचशीला चा अर्थ नुसता माहीत असून चालत नाही, तर ते शिक्षण घेऊन ते विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत. ज्याप्रमाणे आपण स्वतंत्रपणे श्वास घेत असतो, त्याप्रमाणे आचरण अंगीकारणे आवश्यक आहे. अग्नीचा स्वभाव हा उष्ण असून तो प्रमाणापेक्षा जास्त उष्ण असल्यास भाजून ठेवल्याशिवाय राहत नाही. शरीराचे तापमान 37 सेंटी ग्रेट आहे त्याप्रमाणे मनाचे तापमान म्हणजे राग सम्यक ठेवणे आवश्यक आहे. जीवनामध्ये संम्येक विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. आपण महाकारुणीक भगवान बुद्धाचे अविकसित रूप असून, बुद्ध कसे होता येईल यासाठी त्रिसरण, पंचशील, अष्टशील, दशशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दसपार्मिता पूर्ण केल्यानंतरच बुद्धत्व प्राप्त होते.
दहा परमिता मध्ये प्रथमच असलेली दान परमिता ही अत्यंत महत्त्वाची पारमिता आहे. सम्येक आजीविका जगूनच आपली उपजीविका भागविणे आवश्यक आहे. सम्येक उपजीविकतून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे दान देणे आवश्यक आहे. तेच दान फलदायी होते. दुःख मुक्तीचा मार्ग सांगताना प्रथम चार आर्य सत्त्ये सांगितली आहेत. आणि त्यावर उपाय सांगितला आहे. धम्म हा वाचण्यासाठी आणि सांगण्यासाठी खूप सोपा साधा आणि सरळ आहे. परंतु तो आचरणात आणायला खूपच अवघड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा धम्म आपण आचरणात आणुन त्याचा प्रचार व प्रसार चांगल्या प्रकारे करणे ही काळाची गरज आहे. त्यांनी मागासवर्गीयासाठी नव्हे तर सर्व मानव जातीसाठी केलेला त्याग, आपणांस दिलेला धम्म हा किती महान वैद्न्नयानीक आहे, हे सर्व मानव जातीस आपण सर्वानी सहज सुंदर पणे पटवून देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
श्रीलंकेमध्ये दिनांक 17 सप्टेंबर 1864 अनागरिक धम्मपाल यांचा जन्म झाला. त्यांची जयंती काल म्हणजे दिनांक 17/09/2024 रोजी संपन्न झालेल्या जन्मदिनानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगून तसेच ते ख्रिश्चन असून श्रीलंका येथे जन्म होवून सुद्धा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यानी महाबोधी विहार शोधून ते बौद्धांच्या ताब्यात घेणे बाबत जो लढा दिला त्या समर्पित लढ्यास आणि कार्यास अभिवादन केले. शेवटपर्यंत ते भारतात राहून बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसार केला.
ऍड. डॉ. सुगंध वाघमारे एम ए पाली मध्ये प्राविण्य मिळवून त्यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार पाली भाषेसाठी मिळाल्या बाबत विहाराचे उपासक भारतीय बौद्ध सभेचे बौद्धाचार्य दयानंद कांबळे तसेच त्यांच्या सुविद्द सहचारिणी आयुष्यमती सरिता दयानंद कांबळे यांच्यावतीने शाल व बुके देऊन विहारामध्ये आनंदी व उत्साही वातावरणात सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणे विहाराच्या माजी संचालिका शेळके यांचा वाढदिवस त्यांच्या सूनबाई डॉ. घाडगे उत्साही व आनंदी वातावरणात केक कापून साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे उपासिक आयुष्यमती अर्चना लांडगेताई यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच चंद्रकांत नागवंशी सर विहाराचे सदस्य यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. विहारास प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस दहा रुपयाचे डॉलरची जमा होणारी रक्कम आयुष्यमान अमोल सरकार यांनी विहाराचे अध्यक्ष व खजिनदार यांच्याकडे डॉलरची चिल्लर दान म्हणून सुपूर्द केली. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानी आपण जे पीत असलेले पाणी हे अशुद्ध असते, आणि कसे अपायकाराक आहे त्यामूळे कोण कोणते रोग होतात जापनीज लोक आयुष्य वर्धक आसुन त्यांच्या टेक्नॉलॉजी नुसार शुद्ध पाणी व त्याचे महत्त्व ते प्राशन केल्यामुळे आरोग्य निरोगी राहते याची सविस्तर माहिती त्यांनी सर्व उपासक उपासिका यांना दिली. सदर पाण्याचा वापर केला तर आपले आरोग्य व्यवस्थित राहून दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटीं विहाराच्या उपासिका आयुष्यमती चेतना नागवंशी यांनी प्रमुख पाहुणे आणी सर्व उपस्थितांचे आभार मानले. धम्मपालन गाथा म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
भाद्रपद पौर्णिमेच्या कार्यक्रमास एस. आर. माने, खजिनदार, सह. खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालक सी .बी.चौधरी, संचालिका शैलजा संजीव साबळे, दीपा दीपक कांबळे, उषा अशोक कांबळे, माजी संचालिका शेळके ,सुजाता गाडगे वहिनी, अर्चना लांडगे, कांबळे, मीनल आठवले, अमोल सरकार, धनवडे पारमीत धम्मकीर्ती, उत्तम आबा कांबळे, सोहम घाडगे, पवन कदम, बाळू शिंदे त्यांच्या सुविद्य पत्नी ऍड. संजीव साबळे, भिसे, दिपक कांबळे, विजय लांडगे इत्यादी उपासक माता बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या समाप्ती नंतर भाद्रपद पौर्णिमेनिमित्त भोजनदान देण्यात आले.