उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- रविवार दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी दीपस्तंभ सांस्कृतिक संघ विहार कोल्हापूर रोड येथे अशोका विजयादशमी निमित्त बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहाराचे संचालक माजी उपायुक्त आयुष्यमान चंद्रकांत भिवा चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. सर्वप्रथम महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक यांची धूप दीप यांनी विहाराचे अध्यक्ष डॉ. जगन कराडे उपाध्यक्ष यांनी पूजन केले. त्यानंतर त्यांनी प्रमुख पाहुणे सी .बी. चौधरी यांचा शाल धम्मक्रांतीचे बीज पुस्तक सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.
जिथे शिलाचे आचरण केले जाते तेथे बुद्धाच्या गुणाचा जन्म होतो, उगम होतो, विकास होतो, धम्म आचरण आतून मानवी जीवन सुखमय होते, आणि नव समाजाची निर्मिती होते. सर्वप्रथम त्यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. इसवी सन 2600 वर्षांपूर्वी सारनाथ येथे आषाढी पौर्णिमेस सुरुवातीस पाच भिक्षू कवडीण्य ,वप्प, भदिय महानाम आणि अश्वजीत यांना चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक विशुद्धीचा मार्ग सांगितला हे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय .त्यानंतर सम्राट अशोक यांनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तन केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी या दिवशी तिसरे धम्मचक्र प्रवर्तन केले.
बुद्ध त्याचा धम्म या ग्रंथात प्रथम खंड भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात अनापान सती या ध्याना बद्दल माहिती दिली आहे. तसेच याच ग्रंथातील तृतीय खंडात पान क्रमांक 177 वर लिहितात “जीवन सुचिता म्हणजे धम्म होय.”एका वाक्यात धम्माची व्याख्या सुंदर पणे नमूद केली आहे. महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाची शिकवण तसेच सूक्तपिटक विनयपिटक अभिधम्मपिटक या त्रिपिटकामध्ये एकूण 84 हजार गाथा आहेत ,त्यापैकी सुक्तपीठकामध्ये 21000 गाथा तसेच विनय पिटकामध्ये 21000 गाथा तर अभी धम्मपिठामध्ये 42000 गाथा आहेत त्यामध्ये भगवान बुद्धांनी 82000 स्कंद त्यांच्या मुखातून उपदेश केलेली आहेत. तसेच श्रावण संघामधील जे अरहत झाले त्यांनी 2000 गाथा म्हटलेल्या आहेत. सूत्त पिटकांमधील खुद्दक निकाय मध्ये “धम्मपद” हा ग्रंथ असून या ग्रंथामध्ये एकूण 26 वग आणि 492 गाथा आहेत. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सविस्तरपणे बऱ्याच गाथांचा उल्लेख केलेला आढळून येतो.
सुत्तपिटक ग्रंथ याचे सविस्तर मनपूर्वक वाचन केले असता आपणास जवळजवळ बुद्ध आणि त्याचा धम्म याचे पूर्णपणे आकलन होते. विनय पीठकामध्ये भिकू आणि भिकुनी यांचे विनय नमूद केले असून भिकू साठी 227 आणि भिकुनीसाठी 313 विनय नमूद केलेले आहेत. त्याचप्रमाणे अभिधम्म पिटकामध्ये माणसाचे मन आणि शरीर याबाबत अध्यात्मिक विश्लेषण केलेले आहे. मानवी जीवन सुखी करावयाचे असेल तर शीलाचे पालन करणे आवश्यक आवश्यक असून तो प्रथम पाया आहे पाया मजबूत तर मनाची इमारत मजबूत. त्यामुळे शिलाला अत्यंत महत्त्व आहे.
धम्मपदामध्ये यमक वग मध्ये प्रथम द्वितीय आणि पंचम या गाथा मानवी जीवन जगत असताना खूप महत्त्वाच्या आहेत. मनुष्य चांगल्या मनाने वागल्यास माणसाचे जीवनात सुख सावलीप्रमाणे पाटलाग करून कुशल जीवन आनंदाने जगून स्त्रोतापन्ना अवस्थेकडे मार्गक्रमण केले जाते. 84 हजार गाथा वाचायचे झाल्यास आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले तरी ते पूर्ण होणार नाही. भगवान बुद्धाचे साहित्य अथांग समुद्राप्रमाणे विस्तृत आहे. परंतु या 84,000 गाथामध्ये एकच गाथा अशी आहे की, संपूर्ण तीपिटकाचा सार त्यामध्ये लपलेला आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याची चव घेण्याकरिता संपूर्ण पाणी पिण्याची आवश्यकता नाही फक्त एक बोट समुद्रात बुडविले आणि आपल्या जिभेस चाखून पाहिले तर समुद्रातील पाणी पिण्यास योग्य नाही. ते खारट आहे, याची चव कळते. त्याप्रमाणे एकच गाथा आपल्या जीवनामध्ये दररोज ग्रहण करीत असतो, ती आपणा सर्वांना पाठ पण आहे, परंतु त्याचा मतीतार्थ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “सब पापस अकरणं कुसलस संपदा¡ सचित परीयोद पन’ येतं बुद्धान सासन ¡ सर्व प्रकारचे पाप कर्म न करणे हे पहिले तत्व नेहमी कुशल कर्म करणे हे दुसरे तत्व स्वतःच्या चित्ताची मनाची परिशुद्धता करणे हीच भगवान बुद्धाची शिकवण आहे, हे तिसरे तत्व आहे. अशाप्रकारे सर्वांनी या गाथे प्रमाणे आचरण करून आपले जीवन सुखी व संपन्न करावे धम्मदेशना देऊन त्यांनी त्यांच्या वाणीस पूर्ण विराम दिला.
त्यानंतर विहाराचे अध्यक्ष डॉ. जगन कराडे यांनी अध्यक्षीय भाषण केले अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी अशिक्षित कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची मन वढाय वढाय ही कविता सांगून सर्व संस्काराचे मन हे उगम स्थान आहे . त्या किती त्या अशिक्षित असून सुद्धा उत्कृष्ट उपजत प्रतिभा संपन्न होत्या. तसेच आदरणीय राजा ढाले यांनी त्यांच्या अनेक लेखांमध्ये भगवान किंवा भगवंत हे शब्द वापरू नयेत हे नमूद असल्याने ते शब्द न वापरणे योग्य होईल अशी सूचना केली.
अशोका विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष भारत शिंदे, सुरेश माने, आयुष्यमती शुभांगी कांबळे सचालीका, संचालक दयानंद कोलप, संचालक डॉ. विजय भोसले, पारमीत धम्मकीर्ती, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बौद्धाचार्य यशवंत पंडित, विहाराचे कोषाध्यक्ष आर टी कुदळे, संचालक अमोल माने, संचालक निखिल बनसोडे, रमेश कांबळे विजय कांबळे अमोल सरकार आकाश कांबळे, समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा इत्यादी ज्येष्ठ आणि तरुण वर्ग उपासक-उपासिका उपस्थित होते. त्यानंतर भीम गीताचा कार्यक्रम अत्यंत उत्साह व आनंदी वातावरणात साजरा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.