प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने महात्मा फुले वार्ड येथील यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अशोकराव भारशंकर यांचे अध्यक्षतेखाली वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धामजी कांबळे हे होते तसे कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिमटे गुरुजी यांनी केले. यावेळी मार्गदर्शन रेखाताई मुंजामकर, सुनील तेलतुंबडे यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन गेडामताई यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती वार्ड शाखा अध्यक्ष ढवळे ताई या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
गुरुवार दि.18 ऑक्टोंबर 2024 ला भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने महात्मा फुले वार्ड येथील यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित बुद्धामजी कांबळे, संजय च. वानखेडे बौद्धाचार्य/केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा हिंगणघाट सह इतर मान्यवरांनी वर्षावास समाप्ती “अश्विन पौर्णिमा” या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी वासंती देवगडे, राजूजी फुललेले, बाळा भाले सह भारतीय बौद्ध महासभेचे तालुका व नगर शाखेचे संपूर्ण पदाधिकारी तसेच सदस्य आणि वार्डातील शेकडो महिला त्याचप्रकारे उपासक-उपासिका .ई.आवर्जून उपस्थित होते. शेवटी सरनाणतंय घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.