संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात पथदिवे नादुरुस्त असल्याने रात्री आकस्मिक उपचार घेण्याकरिता येणाऱ्या रुग्णांनी गैरसोय होत असल्याचे चित्र प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव इथे दिसत आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, शासनाने अतिदुर्गम भागात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे या हेतूने भव्य इमारत उभारून आरोग्य यंत्रणा पाठवली आहे परंतु सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ. सुखदेव करेवाड हे मुख्यालयी राहत नसून सध्या सरकारी दवाखाण्या कडे कमी आणि स्वतःच्या खाजगी क्लिनिक कडे जास्त लक्ष देत असल्याचे नाकारता येत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथील परिसरात दवाखान्यातील कर्मचारी वास्तव्यास राहतात तिथे रस्त्यावर साप निघाला आणि पथदिवे बंद असल्याने मोठा धोका निर्माण झाला असता परंतु स्थानिकांच्या मदतीने सदर सापाला पकळण्यात आले, सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सुखदेव करेवाड प्रभारी डॉ. असून सुद्धा मुख्यालयी राहत नाही आणि मुख्यालयी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवत असल्यामुळे, भविष्यात जर कर्मचारी मुख्यालयी न राहल्यास आणि रुग्णांना अंधारामुळे धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार हे डॉ. सुखदेव करेवाळ राहील असे नाकारता येत नाही.
सदर बाब रुग्णालयाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे सांगत प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव चे प्रभारी डॉ. सुखदेव करेवाड यांनी स्वतःचे खाजगी क्लिनिक बंद करून दवाखाण्याकडे प्राधान्याने लक्ष देत प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव परिसरातील बंद असलेले पथदिवे त्वरित लावण्याची मागणी परिसरातील नागिकांनी केली आहे.