मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 22 फेरीत मतमोजणी होणार आहे. त्यात 16 व्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना 37396 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजे अंबरीशराव आत्राम यांना 30904 मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम यांना 23420 मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार हमंतू मडावी यांना 21242 मते मिळाली आहे. 16 व्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम 6492 मताने आघाडीवर आहे. अजून 6 फेरीची मतमोजणी बाकी आहे.