अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा व उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांचे वतिने कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा डॉ. स्वप्निल बले यांचे मार्गदर्शनाखाली विकृती पडताळणी व पूर्णचनात्मक शस्ञक्रियापूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात शहरातील व ग्रामीण भागातील विकृती रुग्णांना शिबीरसाठी बोलविण्यात आले होते. याचा 32 कुष्ठरोग रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणून तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रभाकर नाईक, तसेच अध्यक्ष म्हणुन वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रविणा मिसार उपस्थित होते. कुष्ठरुग्ण बांधवांना शासन मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा बाबत माहीती डॉ.नाईक यांनी सांगीतली व त्याचा लाभ घेण्याचे अवाहन केले. यावेळी डॉ.प्रविणा मिसार यांनी रुग्णांना कुष्ठरोग संदर्भ सेवा बाबत माहीती देवुन दर सोमवारला विकृती रुग्णांनी त्याचा लाभ त्यावा व संशयीत रुग्णांनी तपासणी करावी असे अवाहन केले.
यावेळी प्रशांत जंगठे अवैद्यकिय सहाय्यक यांनी रुग्णांना असलेली विकृती मध्ये वाढ होऊ नये व असलेल्या विकृतीची काळजी कशी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले. अशोक वावरे अवैद्यकिय सहाय्यक यांनी कुष्ठरुग्णांना देण्यात येणाऱ्या एम. सी. आर चप्पल, सि्प्लंट, ड्रेसिंग किटचा उपयोग कसा करावा याबाबत माहीती दिली.
यावेळी सर्व मान्यवरांचे हस्ते रुग्णांना एम. सी. आर चप्पल, गाॅगल, सि्प्लंट देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन किशोर येनुरकर कुष्ठरोगतंञज्ञ यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता असलम फारुकी, डखाराम मेश्राम, किशोर पुरजेकर तसेच सर्व कर्मचारी यांनी प्ररिश्रम घेतले.