अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे झालेल्या जिल्हास्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धेमध्ये भारत विद्यालय हिंगणघाट येथील 14 व 17 वर्षांखालील मुलां मुलींमध्ये अदवेद एरमे, आलोक यादव, उत्कर्ष वराडे, कृतिका तराळे, लक्ष्मी भिसे, अथर्व नामेवार, लावण्या चोले या खेळाडूनी प्रथम स्थान प्राप्त करून या सात खेळाडूंची निवड विभागीय आष्टेडू आखाडा स्पर्धेकरिता झाली आहे.
मिळालेल्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भिमनवार सचिव, रमेश धारकर मुख्याध्यापक राजू कारवटकर उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक नांदुरकर, पर्यवेक्षिका सौ बुरीले, क्रीड़ा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर, क्रीडाशिक्षक संदीप चांभारे, प्रशिक्षिका कु. संजना चौधरी व सर्व शिक्षक यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील विभागीय आष्टेडू आखाडा स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.