कळमना बाजार येथे आयोजित बैठकीत घेतला निर्णय.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर २०:- आज कळमना बाजार नागपूर येथे खूप मोठा निर्णय सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिष देशमुख, पणन संचालक श्री.विकास रसाळ, शेतकरी व संत्रा-मोसंबी व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. संत्रा व मोसंबी वर प्रति टनामागे १०० किलो काट जो शेतकऱ्यांकडून घेतल्या जात होता, तो १०० किलो काट रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.
कळमना बाजार समितीत हंगामात २० लाख टन संत्रा-मोसंबीची खरेदी होते. या शेतकऱ्यांकडून प्रति टनामागे १०० किलो याप्रमाणे काट आकारला जातो. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या संत्रा, मोसंबी फळामध्ये काही लहान आकाराची फळे असल्याचे कारण देत हा काट आकारल्या जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही लुटीची परंपरा कायम आहे. ही पद्धत बंद व्हावी याकरीता यापूर्वी देखील सातत्याने मागणी करण्यात आली. पणन मंत्र्यापर्यन्त देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. पण आज आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वात हा १०० किलो काटचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. डॉ आशिषराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाकडे जे संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकरी आपला माल देतात, त्यांना १०० किलोचा काट प्रत्येक टनामागे तेथील व्यापारी कापून घेतात. पणन महासंघाने या संदर्भात ताकीद दिली असताना देखील सातत्याने कित्येक वर्षांपासून हा अवैध प्रमाणामध्ये काट कापण्याचे गैरकृत्य हे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे व्यापारी करत आहेत त्यांच्यावर तात्काळ स्वरूपात कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना या अवैध, अवाजवी वसुलीपासून वाचवावे, अशी विनंती आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी कालच विधानसभेत सरकारला केली होती, हे विशेष. राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील हा मुद्दा डॉ. देशमुख यांनी उचलून धरला होता.
आजच्या बैठकीत आमदार डॉ. आशिष देशमुख, विकास रसाळ, संचालक पणन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री.येगलेवार व कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केटचे अडतीया श्री. ओमप्रकाश मैनानी, श्री मोहम्मद इनाम व श्री मोहम्मद इर्शाद, ऍड. प्रकाश टेकाडे, श्री. अशोक धोटे, श्री. मनोज जवंजाळ संचालक महा ऑरेंज, श्री. महादेवराव नखाते, श्री. अंगद भैस्वार, श्री. प्रदीप पुतेरीया, श्री. सुधाकर ठाकरे व इतर शेतकरी उपस्थित होते.