अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- देशाची अर्थव्यवस्था हि जगात ४ स्थानाची होत असून जगात आपण विश्वशकती म्हणून उदयास येत असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कांगावा हा नुसता खुळखुळा असून देशावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे, जागतिक वित्तीय संस्था व जागतिक बँकचे कर्जांचा विचार केला आणी राज्यावरील असलेले कर्ज लक्षात घेतले, तर देश आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरी कडे वाटचाल करीत आहे, आणी याला फक्त आणी फक्त देशातील सर्वात मोठ्या शेती धंद्यावर सरकारनी टाकलेली बंधने, ग्राहकांना स्वस्तात, फुकटात धान्य पुरवून, कामाप्रमाणे मोबदला न देता, त्यांना वेगवेगळ्या योजनांचे नावांनी सरकारी तिजोरीतून भिकवादी योजना राबवून त्यांची मते घ्यायची, आणी परत सत्ता हस्तगत करायची, सत्तेसाठी विचार, नितीमत्ता सोडून गददा-या करुन सत्ता मिळवायची आणी सत्तेतून पैसा आणी त्याच पैशातून परत सत्ता मिळविण्याचा एक कलमी कार्यक्रम देशातील सत्ताधारी आणी विरोधी पक्ष राबवित आहे.
यासाठी नागरिकांची बदलेलेली मानसिकता, स्वार्थ, यातून समाजात जाती, जातीत, धर्मा धर्मात फुट पाडणा-या घोषणा करणे, आंदोलने करून लोकांचे लक्ष तिकडे भटकवून देणे व याला दुर्दैवाने मिडीयाची साथ मिळाली परिणामी शेतीमालाचे भाव पाडण्याचे धोरण अधिक प्रखरतेने सत्ताधारी राबवित आहे. अशा स्थितीत शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना शेतीमालाचे रास्त भावासाठी बंधनमुकत बाजारपेठ, कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी व वातावरणातील बदलाचा धोका टाळण्यासाठी शेतीत नविन तंत्रज्ञानाचा वापराचे स्वातंत्र्य, शेती मालाचे भाव पाडण्याच्या धोरणे राबवून शेतकऱ्यांवर निर्माण केलेले कर्ज मुक्त करण्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या शरद जोशींच्या विचारातून धोरणे राबविली तरच शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना आणी पर्यायाने देशाला चांगले दिवस येवू शकते.
हा विचार शरद जोशी नी मांडला त्याचा प्रसार, प्रचार करण्यासाठी पुढील वर्षभरात या विचारांचे जिल्ह्यात किमान 1000 हजार बिल्लाधारी कार्यकर्ते निमार्ण करणे व त्यांचे विचारांचा प्रसार करणे, हिच शरद जोशी यांना श्रध्दांजली ठरेल, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांच्या 9 व्या स्मृतीदिना निमित्त मृगगंधा मळा, खातखेडा, पुलगांव येथे आयोजित कार्यक्रमात त्याप्रसंगी बोलतानी व्यक्त केले.
यावेळी आयोजित चर्चासत्रात देशाची आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थिती आणी शेतकरी संघटनेचा विचार यावर चर्चा करण्यात आली. या चर्चा सत्रात बोलतानी स्वभाप चे प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे यांनी देशातील आपण शेतकरी, व्यावसायिक, नागरिकच कर्जबाजारी आहोत हा न्यूनगंड सर्वात पहिले डोक्यातून काढून टाका. जागतीक बॅक चे अहवालानुसार देशातील उद्योग आणी सरकार कडे ६४,७०० कोटी डॉलर रू कर्ज आहे. महाराष्ट्र राज्यावर ९ लाख कोटीचे कर्ज आहे. आणी हा कर्जाचा डोंगर वाढतच जाणार आहे, अशी स्थिती देशात आहे. देशातील सामान्य शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांचे बॅकेचे कर्ज थकबाकी असले तर नविन कर्ज एनपीएच्या नियमानुसार मिळत नाही. हा कायदा अस्तित्वात आहे. पण देशातील मोठे उद्योजक मुकेश अंबानी, अदानी यांना त्यांचे कडे बॅकेचे असलेले २२.९० अब्ज डॉलर चे कर्ज परतफेड करण्यासाठी परत २३ अब्ज डॉलर चे कर्ज देण्याची तयारी १६ मोठया बॅकाकडून सुरू आहे. या देशात मोठ्या औद्योगिक घराण्यांना वेगळा कायदा आणी इतरांना वेगळा कायदा, असे कां? याचा विचार करणे गरजेचे आहे. या विरोधात मिडीया, सर्वच राजकीय पक्ष मृग गिळून गप्प आहे. तेव्हा आलेले नैराश्य बाजूला सारून आपल्या कुंटूबासाठी, देशातील सामान्य माणसाचे प्रगती साठी शरद जोशींच्या विचारा शिवाय पर्याय नाही. यासाठी नव्या दमाने कामाला लागण्याचे आवाहन वक्त्यांनी केले.
याप्रसंगी शेतकरी संघटना ट्रस्टचे अध्यक्ष रविभाऊ काशीकर, माजी आमदार सरोजताई काशीकर, युवा आघाडीचे माजी अध्यक्ष सतिश दाणी, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा शैला देशपांडे, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर, माजी जिल्हा प्रमुख नंदू भाऊ काळे, निळकंठ घवघवे यांनी मनोगत व्यक्त करून शरद जोशींच्या विचारा शिवाय पर्याय नाही, हा विचार नव्या दमाने समाजापुढे मांडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.व यासाठी नविन युवकांशी संपर्क करून त्यांना हा विचार देण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशी, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवि देवांग, संघटनेचे कार्यकर्ते रामदासजी डहाके, अरूण डहाके, मुकदर शेख, माजी सरपंच नागोसे, इंदिरा सावरकर यांना श्रद्धांजली देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कार्यक्रमाचे आयोजक माजी जिल्हा प्रमुख नंदू काळे यांनी तर संचालन माजी जिल्हा प्रमुख पांडूरंग भालशंकर यांनी तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन तालुका प्रमुख प्रमोद तलमले विजय राठी, शांताराम भालेराव यांनी केले.
या कार्यक्रमाला सुभाष बोकडे, शंशाक सबाने, अजाबराव राऊत, जीवन गुरनुले, सुनील हिवसे, सारंगभाऊ दरणे, गणेश मुटे, शेख बाबा, मनोरमा मुटे, मुकेश धाडवे, अरविंद बोरकर, गोविंदा पेटकर, अभिजित लाखे, बालूभाऊ धांदे, प्रभाकर झाडे, रेखा हरणे, सुनंदा तुपकर, मिलिंद देशपांडे, प्रभु जयस्वाल, ऍड मोहन देशमुख, महेश वललभवार, खुशाल हिवरकर, गंगाधर सावरकर, छाया धांदे, जया वललभवार, मालू कुबडे, सोनल राठी, सिंधू इखार, कल्पना काळे, शारदा झाडे, बाबाराव दिवांजी, रमेश बोबडे, विजय ठाकरे, रोजी तलमले, किशोर मोहणापूरे, शंकर पांडे, हेमराज ईखार, भुषण राठी, प्रकाश ढोक, गंगाधर लांडगे, हनुमंत भगत, बाबाराव मायुरे, बाबाराव पठाडे, कुंदू खोडे, सुखदेव पाटील, विठ्ठल धोटे, संजय बोरकर, संजय पाटील, किसना शेंडे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

