कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील गट-ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असेलेल्या तामसी रेती घाटातून शासनाने शासकीय कामा करीता एका कंपनीला राजुरा ते गोविंदपूर महामार्गाच्या कामा करीता घाटास परवानगी दिली परंतु त्या घाटातून होणारी वाहतूक ही तामसी इरई कवठाळा मार्गाने होणार आहे तरी सदर मार्ग हा प्रधानमंत्री ग्रामसळक योजनेचा असून याची समता ही फक्त टॅक्टर ची असताना सदर मार्गांवर शासनाने कोणतीही समता न पाहता हायवे साठी परवानगी दिली आहे.
तरी सदर घाटा बाबत दिनांक 11 डिसेंबर 2024 ला उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसभा घेण्यात आली होती त्या सभेत १०३ लोकांच्या उपस्थिती मध्ये सदर घाट नामजूर करण्यात आला असून दिनांक 15 डिसेंबर 2024 ला कंपनीने ग्रामपंचायतला नाहरकत प्रमाणपत्र आणि ठराव मागितला होता तरी सरपंच आणि सदस्य यांनी कोणतीही ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीला पूर्व सूचना न देता नोटीस बोर्ड वर नोटीस न लावता दिनांक 8 जानेवारी 2025 ला सरपंच आणि सदस्य यांनी ग्रामवासियांना किंवा ग्रामपंचायतला कोणतीही सूचना नं देता संबंधित कंपनीला नाहरकत प्रमाण पत्र देऊन इरई ग्रामवासियांच्या जीवासी खेळ केला.
तरी दिनांक 20 जानेवारी ला निखिल पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यलयात जाऊन रवींद्र माने याची भेट घेऊन इरई कवठाळा मार्गांवर जड वाहतूक सुरु झाल्यास उपोषणास बसू अशा इशारा दिला आहे.

