मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
पुणे (प्रतिनिधी)भिलेवाडा देशातील मुलीची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान व भिलेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हल मध्ये आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हल मध्ये गडचिरोलीच्या कवियत्री सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांनी सहभाग नोंदविला.या समारंभात त्यांची समाज प्रबोधनात्मक कविता सादर केल्याबद्दल संयोजकांनी प्रमाणपत्र, स्मुर्ती चिन्ह ,संविधान पुस्तिका देऊन
सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांना सन्मानित केले हा शेंद्रे परिवाराचा अभिमान आहे.आंतरराष्ट्रीय समेलानंत तेलंगणा, कर्नाटक, महाराष्टातील कानाकोपऱ्यातील ६०० कवीने सहभाग घेतला होता.
चार दिवस चाललेल्या या सोहळ्यात काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.यात फुले,शाहू, फातिमा,आंबेडकर,लहुजी साळवे याचे प्रेरणेने भारावलेले श्री.विजय वडवेराव यांचे पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यांचे मित्र परिवारात सर्वत्र कौतुक होत आहे..

