बाळासाहेबांचा 80% समाजकारणाचा वसा युवासेना पुढे चालवेल: महेश मुडे जिल्हाप्रमुख युवासेना यांचे प्रतिपादन
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट 23 जाने:- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे संस्थापक – क्रांतिकारी सुभाष चंद्रजी बोस यांची जयंती कारंजा चौक हिंगणघाट येथे शिवसेना-युवासेना व महिला आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमांचे पूजन करून सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी वंदन केले.
याप्रसंगी विचार व्यक्त करताना उपजिल्हाप्रमुख रवी धोटे यांनी बाळासाहेबांचा विचार व शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला, तर युवा सेना जिल्हा प्रमुख महेश मुडे यांनी बाळासाहेबांच्या जीवन संघर्षातून आपण काय आदर्श घ्यावा यावर विचार व्यक्त केले व त्यांचा 80% समाजकारणाचा वसा-वारसा जोपासणे हाच खरा शिवसैनिकांचा धर्म आहे व तो शिवसैनिक त्याचे पालन तंतोतंत करतीलच असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक राजू हिंगमेरे प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था त्यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
यावेळी शहर प्रमुख प्रशांत लहामगे, शहर संघटक अमित काळे, उपशहर संघटक अतिश सातपुते, राहुल टेंभुर्णे, महिला आघाडी शहर संघटक हिंगणघाट, सुनिता तांबोळी, समुद्रपूर तालुका महिला आघाडी प्रमुख, संध्या हिवरकर शहर संघटक समुद्रपूर महिला आघाडी, वर्षा हटवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख, दिनेश काटकर, शहर प्रमुख अक्षय निकम व समस्त पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.