अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:– सावनेर येथे २२ जानेवारी बुधवारला स्थानिक संघटना निमा – होमिओ असोसिएशनचे अध्यक्ष पदग्रहण व नविन कार्यकारणी गठन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेच्या २०२५ ते २७ या वर्षाकरिता डॉ.छत्रपती पांडुरंग मानापुरे यांची तर एचडीए होमिओपॅथ डॉक्टर्स असोसिएशन सावनेर यांचे अध्यक्ष डॉ. राहुल दाते यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. निशिकांत थापे अध्यक्ष (आयआयएचपी) महाराष्ट्र राज्य, डॉ. मोहन येंडे महासचिव निमा महाराष्ट्र राज्य, डॉ. नितीन कान्होलकर, अध्यक्ष निमा नागपूर शाखा, डॉ. शरद ठाकूर सचिव निमा शाखा नागपूर, डॉ. पंकज थुल कोषाध्यक्ष निमा शाखा नागपूर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय दोरखंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पराग घाटोळे व डॉ.सुजाता घाटोळे यांनी तर आभार डॉ. प्रशांत राजपूत यांनी मानले. यावेळी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व डॉक्टर निमा होमिओ यांनी अभिनंदन केले व समोरील कार्यकाला करिता शुभेच्छा दिल्या.