रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- परतूर येथे घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून अवैध विक्री करीत असताना परतूर पोलिसांनी छापा टाकून 5 ऑटो रिक्षा, फिलिंग मशीन आणि 6 LPG गॅस सिलेंडर असा एकूण 5,23,400 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त.
दिनांक 26 जानेवारी रोजी परतूर पोलिसांना माहिती मिळाली की, स्टेडियम येथे घरघुती वापराचा गॅस लाल सिलेंडर मधून प्रेशर मशीनच्या मदतीने वाहनात LPG गॅस अवैधरित्या वाहनात भरल्या जात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर अचानक पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी 5 ऑटो रिक्षा, 6 घरगुती गॅस सिलेंडर, प्रेशर मशीन, मोटार, वजन काटा असा एकूण 5,23,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी 1) आली हसन मोहमदी ऑटो चालक 2) अहमद हबीब शेख, 3) सय्यद महबूब सय्यद चांद, 4) सुनील विठ्ठलराव मोहिते, 5) सय्यद सलीम समद यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी अप्पर पोलिस अधीक्षक जालना, दादहरी चौरे उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी.सुरवसे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन परतूर, विठ्ठल केंद्रे पोउप निरिक्षक, पोहेकॉ. अशोक गाढवे, पोकॉ. शामुल गायकवाड, पोकॉ. ज्ञानेशोर वाघ, पोकॉ. सतीश जाधव, चालक पोकॉ स्वप्नील फंड यांनी केली आहे.