पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील नवनिर्माण बहुद्देशीय संस्था म्हणजेच एनएनबीएस च्या वतीने सीए शहीद स्मारका जवळ रस्ता सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती पत्रकाचे विमोचन माजी महापौर दया शंकर तिवारी यांच्या हस्ते केले.
याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रवी गाडगे पाटील यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे संस्थेची शहराध्यक्ष दिलीप नरवडीया यांनी आपले विचार मांडले. प्रवक्ता मनोज मालवीय यांनी लोकांना ट्राफिक संदर्भात नियमाचे पालन करून कसे चालावे हे सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक पाटील, चेतन वडे, सुमित घोटेकर, प्रणय बेनेगर, मनोज खंडवानी, चंद्रकांत मोखारे, डॉ. शालिग्राम चरडे, नेहा मॅडम इत्यादी लोक संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.

