संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०२५ रोज रविवारला काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी भवन, गांधी चौक राजुरा येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सकाळी ठिक ७:३० वाजता भारतीय राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, अँड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, सय्यद सकावत अली, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, दिपा करमनकर, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, क्रिष्णाजी खामणकर, साईनाथ बतकमवार, अशोक चैनानी, पंढरी चन्ने, संदेश करमनकर, रामनंदेश्वर गिरडकर, उईके सर, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेनेकर, कविता उपरे, पुणम गिरसावळे, सुमित्राबाई कुचनकर, अर्चना गर्गेलवार, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अँड. प्रशांत अटाळकर, मतीन कुरेशी, भुषण बानकर, सय्यद साबिर, राजकूमार ठाकूर, प्रणय लांडे यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.