जिल्हाधिकां-यासह विरपत्नी, विरमातांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान. सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट संचलन पुरस्कार
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारतीय प्रजासत्ताकाचा दिनाचा मुख्य सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे उपस्थित होते.
जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ठ कार्य केल्याबाबत जिल्हाधिकारी वान्मथी सी, उपजिल्हाअधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे, यांचा तसेच विरपत्नी व विरमातांचा डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विरमाता शांताबाई वरहारे, विरमाता नलीनी टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी यांचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल अंतर्गत उत्कृष्ठ कार्य व समन्वय केल्याबद्दल तहसिलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, राखीव पोलीस निरिक्षक, पोलीस शिपाई यांचा तसेच अग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तयार करण्यास प्राधान्य दिल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना, आर.आर.पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत उत्कृष्ठ कार्याबाबत सरपंच, सचिव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सन 2024-25 या वर्षात राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांचा, पोलीस महासंचालकाचे पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई यांचा, बालविवाह थांबविण्याकरीता सर्व यंत्रणांनी तत्पर सेवा दिल्या बाबत बाबत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत यशस्वी कामगिरी केल्याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रिडा पुरस्काराराचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठात कलर होल्डरच्या मानकरी ठरलेल्या महिला कुस्तीपटू तसेच पोलीस क्रिडा स्पर्धा लखनऊ येथे झालेल्या वैयक्तिक शरीर सौष्ठव खेळात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या महिला पोलीस शिपाई, पिककर्ज वितरणाचे उत्कृष्ठ कामगिरी करणा-या बँक व होमगार्ड अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन तसेच ध्वजारोहण कार्यक्रमात उत्कृष्ठ पथसंचलन करणारे पथक व सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या शाळांचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.