३० लाख रुपये निधीतून लवकरच होणार सभागृहाची निर्मिती. वैद्यकीय साहित्याचे लोकार्पण सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या समाजसेवींचा सत्कार
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायणसेवा मित्र परिवाराच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सिटी वर्धा येथील लायन्स क्लबचे डायरेक्टर अनिल नरेडी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा ,गिमाटेक्स उद्योग समूहाच्या संचालिका लतादेवी मोहता, टीव्ही टेक्स्टाईल जामचे पारस मुनोत, स्वाद चहाचे अशोक मिहानी, रत्न विद्यानिकेतनचे सचिव हेमंत ओस्तवाल, नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नामुळेच स्थानिक शास्त्री वॉर्ड येथील बालाजी दाल मिल मागिल परिसरात या सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे, यासाठी आ.कुणावार यांनी ३० लक्ष रूपये निधी मंजूर करुन दिला आहे. दि.२६ रोजी या सभागृहाच्या वास्तूचे भूमिपूजन मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी नारायण सेवा मित्र परिवाराचे सर्व पदाधिकारी तसेच महिला सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
उपरोक्त कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरातील रत्न विद्या निकेतन हायस्कूल येथे संस्थेच्या वतीने वैद्यकिय साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. याचवेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवींचा सत्कारसुद्धा करण्यात आला. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान”एक श्याम शहीदो के नाम”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. किरण वैद्य व दुर्गाप्रसाद यादव यांनी केले .उपस्थितांचे आभार सचिव पराग मुडे यांनी मानले.