अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- एसटी महामंडळ कडून बस तिकीटा मध्ये १५ टक्के दरवाढ करण्यात येत असून १ फेब्रुवारी पासून दरवाढ करण्यात येणार आहे. या राज्य शासनाच्या निर्णया विरोधात राज्यभरात शिवसेना (उबाठा) गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे.
हिंगणघाट येथे सुद्धा शिवसेना (उबाठा) कडून आज एसटी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य शासना कडून महामंडळाच्या तिकीट दरात एक फेब्रुवारी पासून 15 टक्के दरवाढ करण्यात येत आहे. या राज्य शासनाच्या निर्णया संदर्भात राज्यभरात शिवसेना (उबाठा) गटाकडून एसटी चा चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
आज हिंगणघाट येथे सुद्धा शिवसेना (उबाठा) गटाकडून याचा विरोध करत हिंगणघाट बस स्थानका समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, माजी नगरसेवक सतीश धोबे, माजी नगरसेवक मनीष देवडे यांच्या नेतृत्वात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.