शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, हिंगणघाट येथील उपविभाग स्तरीय शेतकरी मेळावा प्रसंगी प्रतिपादन.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक तुळसकर सभागृह येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत उपविभागीय स्तरीय शेतकरी मेळाव्याचे उदघाटन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी प्रयोगशील राहून रासायनिक खतांचा वापर करून जमिनीच्या प्रती नुसार पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून शेतीमध्ये यश साधता येईल शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेती कशी फायद्यात आणता येईल या साठी सर्व मिळून प्रयत्न करणे गरजेचे असून ही जबाबदारी तुमची आमची सर्वांची असल्याची भावना व्यक्त केली.
आपल्या भागातील शेतकरी आत्महत्या रोखणे हे सुद्धा मोठे आव्हान असून शेतकऱ्यांनी असा टोकाचा निर्णय न घेता यावर चिंतन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तसेच शेतीच्या पिकांची योग्य निवड करुन चांगले उत्पन्न घेवून नफा मिळवावा प्रत्येक शेतकऱ्यांनी उद्योग म्हणून शेती करावी त्याचप्रमाणे शेतीपूरक जोड व्यवसाय सुरू करून प्रगती साधावी कृषी विभागाने दरवर्षी पिकांचे मुल्यमापन करून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी असे केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकून ते थांबविणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी शंकर तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा, डॉ. जीवन कतोरे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, स्वप्नील तोरणे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट, सचिन सुतार तालुका कृषी अधिकारी, घाईतिडक गटविकास अधिकारी, शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी, बेहेकर, खातोरे मॅडम आदी मान्यवर शेतकरी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.