सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- राष्ट्रीय पोषक आहार अभियान अंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना शहरी प्रकल्प बल्लारपूर तर्फे सुदृढ निरोगी बालक कार्यक्रम आयोजित करण्यात आला 01 ते 30 सप्टेंबर महिन्यात पोषक आहार अभियान अंतर्गत आज दि 21 सप्टेंबर ला क्रांती ज्योती सावित्री आई फुले सभागृह, विद्यानगर वार्डच्या अंगणवाडी मध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेश ब्राम्हणे हे होते तसेच डॉ. बावने सर, मा. टेटे सर प्रकल्प अधिकारी, श्रीमती कुडमेथे मैडम पर्यवेक्षक, श्री. डोहणे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी अनेक बालकांनी विविध नृत्य व गायन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका शिक्षीका यांनी प्रयत्न केले

