राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी :- नवरात्राचा औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे स्रीचा सन्मान हाच आपला अभिमान दृष्टिकोन ठेवून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा उपक्रम भंगाराम तळोधी प्राथमिक उपकेंद्र इमारत येथे राबविण्यात आले. यात 18-49 वयोगटातील महिलांसाठी शूगर, बीपी, हिमोग्लोबीन, रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.तसेच गरोदर माता आणि किशोरवयीन मूलींसाठी पोषक आहार व स्वच्छतेसंबधी मार्गदर्शन, कूष्टरोगाविषयी माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी जि.प.सदस्य सौ वैष्णवी यांनीसूध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळेस सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, प्राध्यापिका सौ कूंदाताई पित्तूलवार, सौ शारदा गूडमेट्लावार, डाॅ पाचगावडे, डाॅ धात्रक, बूरडकर, मडावी, सर्व आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशावर्कर,व गावातील महिला उपस्थित होत.