Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

आज डॉ. बाबासाहेब जिवंत असते तर महाकुंभात जाऊन अंघोळ करणारे ते पहिले, डॉ.बाबासाहेब व भारतीय संविधाना बद्दल अभाविप नेत्याचे वादग्रस्त विधान.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 30, 2025
in देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आज डॉ. बाबासाहेब जिवंत असते तर महाकुंभात जाऊन अंघोळ करणारे ते पहिले, डॉ.बाबासाहेब व भारतीय संविधाना बद्दल अभाविप नेत्याचे वादग्रस्त विधान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- एबीव्हीपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे विदर्भ प्रांताचे 53 वे प्रांत अधिवेशन 28 ते 30 जानेवारी 2025 या दरम्यान नागपूर येथे संपन्न झाले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तिरंगा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी. राज यांनी केलेल्या विधानावरून आता चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधाना बद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

अधिवेशनात काय म्हणाले श्रवण बी. राज. भारतीय संविधान निर्माण करताना नंदलाल बोस यांनी संविधानाचे चित्र काढले होते. त्यात भगवान गौतम बुद्ध व सर्व देवीदेवतांचे चित्र होते. सत्यमेव जयते हे घोष वाक्यही होते. हे नक्षलवाद्यांनी किंवा माओ, स्टॅलीनने दिलेले नाही. त्यामुळे भारतीय संविधान हे सनातन धर्माचे संविधान आहे, भारतीय संविधानाची प्रेरणा सनातन धर्मात आहे, असे मत श्रवण बी. राज यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, 2047 पर्यंत भारताला मुस्लीम देश बनवणार असे काही संघटना म्हणत आहेत तर नक्षलवादी विचारधारा भारताचे तुकडे करण्याची भाषा करीत आहे. जातींमध्ये भेदभाव करण्याचे काम काही संघटना करत आहेत. भारतीय संविधानावरही वादविवाद होत आहेत. संविधानाची हत्या केली, असा आरोप होत आहे. परंतु, ज्यांनी आणीबाणी आणली त्यांनीच संविधानाची हत्या केली. संविधान हे सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. आज राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाले, राम मंदिर उभारण्यात आले. हे अभाविपसारख्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून होत आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काय म्हणाले?: प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. ते खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. येथे जात धर्म पाहिला जात नाही. त्यामुळे आज जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर महाकुंभात जाऊन अंघोळ करणारे ते पहिले राहिले असते, असे एबीव्हीपी चे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी. राज म्हणाले.

अराजक स्थिती निर्माण केली जात आहे: सध्या देशभरात वामपंथी विचारधारेचे कार्यकर्ते महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये गैरप्रकार करून त्याठिकाणी अराजक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभाविप कार्यकर्त्यांनी आपली छात्रशक्ती दाखवत हे सर्व देशविरोधी कारस्थाने हाणून पाडावे, असे आवाहन अभाविपचे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी. राज यांनी तिरंगा चौक येथे आयोजित सभेत केले.

Tags: ABVPDr. Babasaheb AmbedkarNagpur liveडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल वादग्रस्त विधान
Previous Post

मराठी अभिनेत्याचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान, शिवाजी महाराज यांनी लाच देऊन…!

Next Post

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In