Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 30, 2025
in आंदोलन, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमृतसर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पवित्र सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावर टाऊन हॉलजवळ असणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड एका माथेफिरुने रविवारी केली. त्यामुळे संविधान प्रेमी आणि आंबेडकरी विचारांच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी अमृतसरच्या टाऊन हॉल येथील सुवर्ण मंदिराजवळील बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठित पुतळ्याची तोडफोड एका व्यक्तीने केली. या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीचे नाव आकाशदीप सिंग असे आहे, जो धरमकोट येथील भूपिंदर सिंग यांचा मुलगा आहे. आकाशदीप सिंग हा एका उंच शिडीवरून चढून हातोड्याने पुतळा तोंडतांना दिसत आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाने पुतळ्यासमोर दगडात कोरलेले संविधान पुस्तक प्रतिकात्मकपणे जाळले. ही घटना दुपारी 3 वाजता सुवर्णमंदिराकडे जाणाऱ्या वर्दळीच्या हेरिटेज स्ट्रीटवर घडली. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामुळे हा रस्ता पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यात तरुण 10 फूट उंचीच्या पुतळ्यावर बसून त्याच्या शिखरावर हातोडा मारताना दिसत आहे. पाहणाऱ्यांनी खाजगी सुरक्षा रक्षकांना सावध केले. सुरक्षारक्षकांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. जेव्हा तो खाली उतरला तेव्हा त्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमृतसर पोलिस करत आहेत.

तोडफोडीची बातमी पसरताच, अमृतसरमधील विविध दलित संघटनांचे सदस्य पुतळ्याजवळ जमले आणि धरणे आंदोलन करत घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत होते. हा प्रकार संतापजनक असून सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी काही समाज विघातक वृत्तीच्या इसमांनी ही घटना घडवून आणली आहे. संबंधित आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकरी विचारांच्या लोकांनी

Tags: AmritsarDr. Babasaheb AmbedkarPanjabप्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड
Previous Post

आज डॉ. बाबासाहेब जिवंत असते तर महाकुंभात जाऊन अंघोळ करणारे ते पहिले, डॉ.बाबासाहेब व भारतीय संविधाना बद्दल अभाविप नेत्याचे वादग्रस्त विधान.

Next Post

आनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोस, गावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोस, गावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.

आनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोस, गावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In